34 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषओडिशा रेल्वे अपघातानंतर परिस्थिती पूर्ववत करणाऱ्यांचे हात 'हजार'

ओडिशा रेल्वे अपघातानंतर परिस्थिती पूर्ववत करणाऱ्यांचे हात ‘हजार’

१००० हून अधिक मनुष्यबळ अथकपणे काम करत आहेत

Google News Follow

Related

ओदिशात झालेला हा अपघात इतिहासातील मोठा अपघात मानला जात आहे. अपघात झाल्यापासून सर्व रेल्वे मार्ग विस्कळीत झाले आहेत.मात्र आता या मार्ग पूर्ववत करण्याचे काम सुरू झाल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर , रेल्वे मंत्रालयाने सांगितले की, हा सगळा परिसर पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे आणि “एक हजाराहून अधिक” कामगार आणि अधिकारी अपघातस्थळी उपस्थित आहेत.

 

मंत्रालयाने सांगितले की, अधिकारी अपघाताच्या ठिकाणी बचावकार्याच्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीम्स आणि ओडिशा डिझास्टर रॅपिड ऍक्शन फोर्स (ODRAF), रेल्वे पोलीस अपघातस्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरु केले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेत, बचाव कार्यादरम्यान ते तिथेच थांबले होते.

 

ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार येथे शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. तर जवळपास १००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी ७९३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३८२ जणांवर उपचार सुरू आहेत.शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एक मालगाडी यांच्या रेल्वे धडकेत हा अपघात झाला.

हे ही वाचा:

दोषींना कठोर शिक्षा होईल, कुणालाही सोडणार नाही!

राऊतांचे राजकारण थुकरट वळणावर!

ओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

सध्या, रेल्वे मंत्रालय, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीम्स आणि ओडिशा डिझास्टर रॅपिड ऍक्शन फोर्स (ODRAF) या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुळावरून घसरलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे. जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे.रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी १००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

 

एनडीआरएफने सांगितले की, ४४ जिवंत पीडितांना वाचवल्यानंतर आणि आतापर्यंत ११२ मृतदेह बाहेर काढल्यानंतर, एनडीआरएफ टीम इतर एजन्सीसह अंतिम शोध घेत आहेत. ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. पंतप्रधानांनी ओडिशाच्या बालासोरमध्ये बचाव कार्यात सहाय्य करणाऱ्या नागरिकांच्या आणि स्वयंसेवकांच्या धाडसाचे, तत्परतेचे आणि सहानुभूतीचे कौतुक केले.

 

पंतप्रधान मोदी यांनी नोंदवले की नागरिकांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी स्वतःला “मग्न” केले होते आणि अनेक रक्तपेढ्यांमध्ये रांगेत उभे होते.रेल्वे अपघातात कोणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २ लाख रुपये आणि इतर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.  

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा