शंभरीतल्या आजींनी सांगितली ‘मन की बात’, ‘आमचा तुला आशिर्वाद .. सुखी रहा’

हॉलमध्ये देखील भावुक वातावरण झाले

शंभरीतल्या आजींनी सांगितली ‘मन की बात’, ‘आमचा तुला आशिर्वाद .. सुखी रहा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या मन की बातच्या १०० व्य भागाची जगभरात चर्चा होत आहे. मन की बात ऐकण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातील लोकांमध्येही उत्साह दिसून आला. न्यूझीलंडच्या ऑकलँडमध्ये देखील असेच काहीसे वातावरण होते. येथे ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. सर्व अनिवासी भारतीयांनी एकत्र येऊन लाईव्ह स्क्रीनवर हा कार्यक्रम बघितला.

या सर्व प्रेक्षकांमध्ये विशेष उपस्थिती होती ती रामबेन यांची. शंभरी गाठलेल्या रामबेन देखील कार्यक्रमासाठी या हॉलमध्ये येऊन दाखल झाल्या. अनिवासी भारतीयांबरोबरच अन्य अनेक लोक घरी कार्यक्रम बघण्यापेक्षा एकत्र जमून बघूया असा विचार करून आले होते. त्यामुळे हॉलमध्ये गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यावर रामबेन उठल्या. जवळच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटो जवळ आल्या . फोटोवरून हात फिरवत ‘आमचा तुला आशिर्वाद .. सुखी रहा’ असा आशिर्वादही देऊन टाकला.

आजीबाई रामबेन यांचा आशीर्वाद देतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये रामबेन पोस्टरवर हात फिरवत गुजरातीमध्ये आशीर्वाद देत असतांना दिसत आहेत. हॉलमध्ये देखील भावुक वातावरण झाले होते. रामबेन यांनी पंतप्रधानांना आशीर्वाद देत आपल्या मन की बात कथन केली. रामबेन यांच्या या आशीर्वादाची सभागृहात चांगलीच चर्चा रंगली होती.

केवळ ऑकलँडचं नाही तर संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयातही एक कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले. याशिवाय लंडनमधील इंडिया हाऊसमध्ये कार्यक्रमाचे लाईव्ह स्क्रीनिंगही करण्यात आले. २२ भारतीय भाषा, २९ बोली भाषा यांच्याशिवाय फ्रेंच, चीन, इंडोनेशिया, तिबेट , बर्मा , बलूची, अरबी, पश्तू, फारसी, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये मन कि बातचे प्रसारण केले जाते. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकरन्यू जर्सी येथे अनिवासी भारतीयांच्या सोबत हा कार्यक्रम ऐकला.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशच्या राम सिंह यांनी केला चक्क रेडिओंचा संग्रह!

नेपाळ वरून येऊन ‘ते’ करतात रत्नागिरीतील हापूस आंब्याची राखण !

प्रतीक्षा संपली.. केबीसीच्या हॉट सीट समोर होणार ‘बिग बी’ची एंट्री

एटीएम ते जीएसटी; महाराष्ट्र दिनापासून होणार चार मोठे बदल !

युनेस्कोच्या महासंचालकांनी केले अभिनंदन

युनेस्कोच्या महासंचालिका ऑड्रे अझोल यांनीही कार्यक्रमाच्या १०० व्या भागासाठी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या. ऑड्रे अझोल यांनी रविवारी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींशी संवाद साधला. युनेस्कोच्या महासंचालकांनी ‘मन की बात’च्या १०० व्या भागाच्या अद्भुत प्रवासाबद्दल देशवासियांचे केवळ अभिनंदनच केले नाही तर भारतातील शिक्षण आणि सांस्कृतिक जतन यावर प्रश्नही विचारले. मन की बात साठी तुमचे अभिनंदन करतो. भारत आणि युनेस्कोचा इतिहास खूप जुना आहे. युनेस्को शिक्षणावर काम करत आहे. २०३० पर्यंत आम्हाला सर्वत्र दर्जेदार शिक्षण द्यायचे आहे. आम्हालाही संस्कृती वाचवायची आहे. याबाबत भारताची भूमिका सांगू शकाल का? असा प्रश्न त्यांनी केला.

Exit mobile version