मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिकांना महागाईपासून दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. या गॅसचे प्रति सिलिंडर दर १०० रुपयांनी कमी झाले आहेत.

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १०० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. यानुसार मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता १ हजार ८४४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर १ हजार ८८५ एवढा झाला आहे. कोलकतामध्ये गॅस सिलिंडरचे दर १ हजार ९९५ रुपये इतके झाले आहेत.

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात एलपीजी गॅसच्या दरात ३६ रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज दिलासादायक अशी १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मात्र, ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

Exit mobile version