मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण

कामाला आता गती मिळणार

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आता सुसाट; प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण

देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार आहे. या प्रकल्पातील एक टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाचे १०० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. सोमवार, ८ जानेवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली येथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी १,३८९.४९ हेक्टर जागेचे संपादन करण्यात आले आहे. दरम्यान, आवश्यक असलेल्या जमिनीचा ताबा मिळाल्याने, पुढील कामे वेगात सुरू होणार आहेत, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देण्यात आली आहे.

गेल्या एका वर्षांत बुलेट ट्रेनला आवश्यक असलेल्या जागेपैकी १.१२ टक्के जागा ताब्यात घेणे बाकी राहिले होते. मात्र, ते आता पूर्ण झाले असून ती जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाला एक वर्षाचा कालावधी लागला. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यात ४३०.४५ हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. जानेवारी २०२३ मध्ये ४३०.४५ हेक्टर जमिनीपैकी ४२५.२४ हेक्टर (९८.७९ टक्के) जमिनीचे संपादन करण्यात आले. तर, गुजरातमध्ये ९५१.१४ हेक्टर जमिनीपैकी ९४०.७७ हेक्टर (९८.९१ टक्के), तर दादरा नगर हवेलीमध्ये ७.९० हेक्टर जमिनीचे संपूर्ण भूसंपादन केले होते.

डिसेंबर २०२३ मध्ये गुजरातमध्ये १०० टक्के, दादरा नगर हवेली १०० टक्के आणि महाराष्ट्रात ९९.८३ टक्के भूसंपादन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये ठाणे जिल्ह्यामधील काही भागातील जागा संपादित करून, राज्यातीलही १०० टक्के जमीन नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिपत्याखाली आली आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ रोजी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ची स्थापना केली. यामध्ये देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे बनविण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपवले. या कंपनीने देशातील पहिली मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. मात्र गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेलीमधील जमीन ताब्यात घेण्यास विलंब होत होता.

हे ही वाचा:

‘ईजमायट्रिप’ने स्थगित केल्या मालदिवच्या सर्व विमानाचे बुकिंग!

मराठा आंदोलकांना लगाम घालण्यासाठी याचिका

मालदीवमधले लोकंही गुगलवर सर्च करतायत ‘लक्षद्वीप’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाले अयोध्येचे निमंत्रण…

प्रकल्पाची सद्यस्थिती –

Exit mobile version