23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष१०० कोटी लोकांनी एकदा तरी केले 'मन की बात' चे श्रवण

१०० कोटी लोकांनी एकदा तरी केले ‘मन की बात’ चे श्रवण

. १,००० पेक्षा जास्त रेडिओ स्टेशनवरून प्रसारण

Google News Follow

Related

आयआयएम रोहतकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमावर अभ्यास केला आहे. प्रसार भारतीने हा अभ्यास केला आहे. या अभ्यासात १०० कोटी लोकांपैकी एकदा तरी मन की बात कार्यक्रम ऐकला आहे तर२३ कोटी लोक नियमितपणे ‘मन की बात’ ऐकतात. यापैकी १७.६ % लोक रेडिओवर ऐकतात, ४४.७% लोक टीव्हीवर बघतात तर ३७.६% लोक मोबाईलवर ऐकतात असे या अभ्यासात दिसून आले आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बातमध्ये उपस्थित केलेले सर्वात लोकप्रिय विषय म्हणजे भारताची वैज्ञानिक कामगिरी, सामान्य नागरिकांच्या कथा, सशस्त्र दलांचे शौर्य, तरुणांशी संबंधित समस्या आणि पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांशी संबंधित विषय, समस्या असल्याचे आयआयएम रोहतकच्या अभ्यासामध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाचा शुभारंभ ३ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झाला आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित केला जातो . ३० मिनिटांचा हा कार्यक्रम ३० एप्रिलरोजी १००भाग पूर्ण करत आहे. मन की बातचा १००वा भाग रविवारी देशभरातील अनेक सामुदायिक रेडिओ स्टेशन आणि खाजगी रेडिओ स्टेशन्ससह १,००० पेक्षा जास्त रेडिओ स्टेशनवरून प्रसारित केला जाईल असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटले आहे.

११ परदेशी भाषांमध्येही प्रक्षेपण
मन की बात २२ भारतीय भाषा आणि २९ बोली भाषा तसेच ११ परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो . यामध्ये फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मीज, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यांचा समावेश आहे.ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे मन की बात प्रसारित केली जात असल्याचेही गौरव द्विवेदी यांनी सांगितले.

देश-विदेशासह ४ लाख ठिकाणहून प्रसारण
‘मन की बात’चा १०० वा भाग संस्मरणीय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने विविध तयारी केली आहे. भाजपने देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सरासरी १०० ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, जिथे लोकांना ते ऐकता येईल. मोदींचे भाषण ऐकण्यासाठी पक्ष विदेशासह सुमारे चार लाख ठिकाणी व्यवस्था करणार आहे.

हे ही वाचा:

भारतात येण्यासाठी आता दुबईत अडकलेल्या अभिनेत्रीला हवाय पासपोर्ट

महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला

निवासी, अनिवासी मालमत्ता विकून मिळाला १० वर्षातला विक्रमी महसूल

महिलाही आता तोफा हाताळणार; लष्कराच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये ५ महिला

मन की बात बद्दल ९६ % लोकांना माहिती
अभ्यासात असे आढळून आले की सुमारे ९६ % लोकांना मन की बात बद्दल माहिती आहे.
या अभ्यासात १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश होता.
६५ टक्के लोक हिंदीत कार्यक्रम ऐकतात, तर १८ टक्के इंग्रजीत ऐकतात.
१९ ते ३४ वयोगटातील ६२ % लोक मोबाईलवर मन की बात ऐकतात.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ३.२% लोक टीव्हीवर मन की बात पाहतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा