पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता  

पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या

पंजाबमध्ये विचित्र आणि मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लुधियानामधील खन्ना येथे १०० वाहने एकमेकांवर आदळल्याची विचित्र घटना समोर आली आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.

पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास १०० गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ हा अपघात घडला. या अपघाता सुमारे १२ जण जखमी झाले आहेत. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.

हे ही वाचा.. 

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिकहानीही झाल्याची माहिती समोर आली आहे. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि धुके यामुळे दृष्यमानता कमी होऊन अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे २०- २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Exit mobile version