25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषअनेक दशके सत्ता राबवूनही काँग्रेसने महिलांची कुचंबणा केली!

अनेक दशके सत्ता राबवूनही काँग्रेसने महिलांची कुचंबणा केली!

स्वच्छ भारत मिशनमुळे महिलांना मिळाला आत्मसन्मान, आमदार भातखळकरांचे ट्विट

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार स्थापन होताच अनेक उपक्रमांसह सुरु करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला आज १० वर्षे पूर्ण झाली. महात्मा गांधींच्या जन्मदिनी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. १० वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाची स्वच्छतेसंदर्भात आलेली आताची आकडेवारी, या मोहिमेचे यश सांगून जाते. या मोहिमेमुळे पुरुषांसह महिलांची मोठी सुटका झाली आणि त्यांना आत्मसन्मानाने जगणे शक्य झाले. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

अतुल भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, कांग्रेसने या देशात काही दशके सत्ता राबवली, परंतु तरीही देशातील जनसंख्येचा एक मोठा घटक, ज्यामध्ये महीला सुद्धा आहेत त्यांना उघड्यावर शौच करणे भाग होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलले. गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आज अशी परिस्थिती आहे, कि देशातील महीलांची या कुचंबणेतून सुटका झालेली आहे. त्यांना आत्मसन्मानाने जगणे शक्य झालेले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये ग्रामीण आणि शहरी अशा दोन घटकांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश उघड्यावर शौचास जाणे, अस्वच्छ शौचालये सुधारणे, हाताने कचरा काढून टाकणे, घनकचरा व्यवस्थापन वाढवणे आणि स्वच्छतेच्या संदर्भात वर्तनात्मक बदल करणे हा आहे.

हे ही वाचा : 

डेन्मार्कमध्ये इस्रायली दूतावासाजवळ दोन स्फोट

‘स्वच्छ भारत मिशन’च्या दशकपूर्तीला मोदींनी लोकसहभागाची घेतली दखल!

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करून चूक केलीये, आता परिणाम भोगा

हिजबुल्ला- इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील भारतीयांसाठी ऍडवायजरी

या उपक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू उघड्यावर शौचास जाणे हा होता आणि सरकारने २०१९ मध्ये भारत सरकारने “उघड्यावर शौचमुक्त” घोषित केले. उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, जागतिक बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, २०२२ मध्येही ११ टक्के लोकसंख्या उघड्यावर शौचास जात आहेत, जे जास्तकरून ग्रामीण भागात आहेत.

सरकारने ५,०७,५८७ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट २५ टक्क्यांनी अधिक केले आहे, ज्यामुळे ६,३६,८२६ शौचालये पूर्ण झाली आहेत. याव्यतिरिक्त, शौचालय सुविधांपर्यंत पोहोचण्याच्या बाबतीत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, २०१९-२१ मध्ये ८२.५ टक्के कुटुंबांनी शौचालय सुविधा पोहचल्याची नोंद केली, जी २००४-०५ मध्ये ४५ टक्के इतकी होती. शहरी केंद्रांमध्ये शौचालयांची उपलब्धता ९५.६ टक्के आहे, तर ग्रामीण भारतात ७६ टक्के आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३० टक्क्यांहून अधिक शौचालय कव्हरेज असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रति हजार जिवंत जन्मांमागे बालमृत्यू दर (IMR) ५.३ आणि ५ वर्षाखालील मृत्यू दर (U5MR) मध्ये ६.८ ची घट दिसून आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा