25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन'

‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’

भाजपाचा प्रियंका गांधी वड्रा यांच्यावर आरोप

Google News Follow

Related

कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसच्या चुप्पीवर भाजपाने काँग्रेसच्या नेत्यांना घेरले आहे. काँग्रेस महिला नेत्या प्रियंका गांधी वड्रा गाझावरील हल्ल्यावर ट्वीटकरतात, मात्र मंदिरावरील हल्ल्यावर मौन बाळगतात, असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना हिंदूंच्या जीवनाची काहीच किंमत नसल्याचेही भाजपाने म्हटले आहे.

भाजपा प्रवक्ता प्रदीप भंडारी म्हणाले की, हे बघून दुःख जेव्हा राष्ट्रहितासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असते तेव्हा गाझावर १० ट्वीट करणाऱ्या प्रियंका वड्रा, देशाच्या अल्पसंख्याकावर बोलणारे राहुल गांधी कॅनडा आणि बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदुवरील हल्ल्यावर शांत बसतात.

हे ही वाचा : 

सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही

चौकशीसाठी हजर राहा! सिद्धरामय्या यांना समन्स

‘हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते बनवू’

कॅनडामधील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हजारो कॅनेडियन हिंदूंकडून एकता रॅली

देशात अथवा परदेशात कोठेही हिंदुवर हल्ला झाल्यास पंतप्रधान मोदी पुढे सरसावतात असे प्रदीप भंडारी यांनी म्हटले. ते म्हणाले, बांगलादेशपासून कॅनडापर्यंत अथवा देशात कोठेही जेव्हा-जेव्हा भारतीय किंवा देशातील जनतेला संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाठीशी उभे असतात. हिंदुवर कोठेही हल्ला झालातर त्यावर पंतप्रधान बोलतात, चिंता व्यक्त करतात. अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करतात. मात्र, विरोधक यावर मौन बाळगतात, असे प्रदीप भंडारी यांनी म्हटले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा