28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषआयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार

आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीग फार कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. जगभरातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगच्या यादीतही आयपीएलचा समावेश करण्यात येतो. बीसीसीआयनं पुन्हा एकदा आयपीएलचा विस्तार वाढवण्याच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड पुढच्या महिन्यात दोन नव्या संघांसाठी लिलावाचं आयोजन करण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीसीसीआयनं यापूर्वीच आयपीएलमध्ये संघाची संध्या ८ वरुन १० करणार असल्याची घोषणा केली आहे.

क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय लवकरात लवकर आयपीएलमध्ये दोन नव्या संघाचा समावेश करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही नव्या संघांसाठी बोली लावण्यासाठी लिलावाचं आयोजन पुढील महिन्यात जुलैमध्ये केलं जाऊ शकतं. त्यासोबतच आयपीएलच्या नव्या संघांसाठी बोली लावण्यासाठी उत्सुक असणाऱ्या कंपन्यांना बोलीच्या रकमेचा अंदाजही आला आहे.

रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, आयपीएलच्या नव्या संघांसाठी बीसीसीआय १८०० कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवू शकते. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सची किंमत १८५५ रुपये आहे, तर आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघांपैकी एक संघ म्हणजे, सीएसके. याची वॅल्यू २३०० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

हे ही वाचा:

आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई

विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार?

कोवॅक्सिन अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवरही प्रभावी

महिना १०० कोटी खंडणी गोळा करण्याआधी केंद्राला विचारले होते काय?

आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या किमतींमध्ये जवळपास एक हजार कोटी रुपयांचं अंतर आहे. मुंबई इंडियन्सची किंमत २८०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. राजस्थान रॉयल्स व्यतिरिक्त सनराइजर्स हैदराबादची किंमत मुंबई इंडियन्स आणि सीएसकेच्या तुलनेत कमी आहे.

इतर संघांची किंमत पाहता बीसीसीआय नव्या संघासाठी १८०० कोटी रुपयांची बेस प्राइज ठेवू शकते. नव्या संघांची किंमत २५०० कोटी रुपयांच्या जवळपास जाण्याचा बीसीसीआयचा अंदाज आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा