वडोदरा येथील हर्णी तलावात पिकनिकला गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट उलटली. यामध्ये दोन शिक्षकांसह १२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. यासोबतच सात विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, बोटीत चार शिक्षकांसह २३ मुले होती. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विद्यार्थी शाळेच्या सहलीसाठी हर्णी तलावावर आले होते आणि हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय बचाव पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. तलावातून अनेक ६ विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत वडोदराच्या महापौर पिंकी सोनी यांनी सांगितले की, पर्यटक मुले आणि शिक्षकांना घेऊन जाणारी बोट उलटली आहे.बचावकार्यही सुरू करण्यात आले आहे. या बोटीमध्ये एका खाजगी शाळेचे २७ विद्यार्थी आणि शिक्षक होते, त्यापैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. वडोदरा शहरातील हरणीलेकवडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशन (VMC) सोबतच्या करारानुसार कोटिया फर्मद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाते. घटनेच्या वेळी बोटीमध्ये एकूण २३ मुले आणि ४ शिक्षक होते. व्हीएमसी अग्निशमन विभागाने तलावात बचाव कार्य सुरु केले आहे. ही मुले न्यू सनराईज स्कूलमधील होती.
हे ही वाचा:
सचिन तेंडुलकरचा व्हिडीओ वापरला, तक्रार दाखल!
ट्रेनमध्ये तिकीट परीक्षकाकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबित!
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीसह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल!
भारत जोडो न्याय यात्रेचं अखिलेश यादवांना आमंत्रण नाही; स्वतःची पदयात्रा सुरू करणार
वडोदरा मुख्य अग्निशमन अधिकारी पार्थ ब्रह्मभट्ट सांगतात की, वडोदरा अग्निशमन विभागाच्या सर्व ६ टीम मोटनाथ तलावावर पोहोचल्या आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता जान्हवी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत १० ते ११ मुलांना वाचवण्यात यश आले आहे. अग्निशमन विभागाने त्यांना घटनास्थळी सीपीआरही दिला असून विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सुटका करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जेव्हा मुले बोटीत चढली तेव्हा त्यांना घालण्यासाठी लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते, ही मोठी चूक असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. या बोटीची क्षमता केवळ १५ लोकांची होती मात्र त्यात २७ जण होते, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला. छाया पटेल आणि फाल्गुनी सुर्ती अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवानही बचाव कार्यात सामील झाले आहेत.