तामिळनाडूमध्ये एका उत्सवादरम्यान भाविकांना विजेचा धक्का लागून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तंजावर जिल्ह्यातील कालिमेडू शहरात उत्सवादरम्यान काही भाविकांना विजेचा धक्का बसला. त्यावेळी १५ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
तंजावार जिल्ह्यात भगवान अय्यपाचा उत्सव मंगळवार, २६ एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जवळपासच्या भागातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान काही भाविक मंदिराचा रथ रस्त्यावरून ओढत असताना विजेची तार रथात अडकली आणि त्यामुळे दोन लहान मुलांसह ११ जणांचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर घटनेत जखमी झालेल्या इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हे ही वाचा:
वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!
अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!
या परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. विजेच्या तारेतून वीज प्रवाहित झाल्याने भाविकांना धक्का बसला. हा धक्का इतका जोरदार होता की, जवळपास ५० भाविक दूर फेकले गेले. तर अनेकांनी भीतीने तिथून पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास तिरुचिल्लापल्ली पोलिस करत आहेत, अशी माहिती पोलिस अधिकारी व्ही. बाळक्रिष्णन यांनी दिली आहे.