पश्चिम बंगालमध्ये एका वाहनाला विजेचा धक्का बसून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये ही दुर्घटना घडलिया असून दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रविवार, ३१ जुलै रोजी रात्री उशिरा हा अपघात घडला.
मेखलीगंज पोलीस ठाण्याच्या परिसरातील धारला ब्रिजवर रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जल्पेशकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनाला पुलावर विजेचा धक्का बसला. यात १० जणांचा मृत्यू झाला तर, १६ जण जखमी झाले आहेत. गाडीत विद्युत प्रवाह जनरेटर यंत्रणेमुळे आला असावा असा प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
वाहनाच्या मागील बाजूस हे जनरेटर ठेवण्यात आले होते. या वाहनात २७ जण प्रवास करत होते. विजेचा धक्का लागून प्रवाह वाहनात पसरला. त्यामुळे १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य १६ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वाहन चालक फरार आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख
शिवीगाळप्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या
आठ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक!
संजय राऊतांच्या घरातून ११.५० लाखांची रोकड जप्त
दरम्यान, अपघातातील सर्व प्रवासी सीताकुची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.