हल्दवानी हिंसाचारात वाँटेड असलेल्या दोघांसह १० जणांना अटक!

पोलिसांकडून मुख्य आरोपी अब्दुल मलिकचा शोध

हल्दवानी हिंसाचारात वाँटेड असलेल्या दोघांसह १० जणांना अटक!

हल्दवानी येथील बनभूलपुरा भागात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचारातील फरार असलेल्या दोन वाँटेड आरोपींसह पोलिसांनी सोमवारी एकूण १० आरोपींना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काडतूसेही जप्त करण्यात आली आहेत.

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभूलपुरा येथे झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाईला जोर दिला आहे.आरोपीना पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.या कारवाईत पोलिसांनी दोन वाँटेड आरोपींसह १० आरोपीना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.अटक करण्यात आलेल्यांवर हिंसाचार भडकावण्यासोबतच आरोपींनी दंगलखोरांना पेट्रोल बॉम्ब पुरवल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

‘फारुख अब्दुल्ला मोदींना भेटत असत!’

अफगाणिस्तानात जिवंत लोकांचे फोटो काढण्यास मनाई

अखिलेश म्हणाले, जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतरच समाजवादी ‘न्याय यात्रेत’ सहभागी होईल!

‘अश्विनचा घरी परतण्याचा निर्णय योग्यच!’

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पीएसी जवानांकडून लुटलेली काडतुसे आणि पेट्रोल बॉम्ब बनवण्यासाठी जमा केलेले पेट्रोल पोलिसांनी जप्त केले आहे.बनभूलपुरा हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी ६८ गुन्हेगारांना अटक केली आहे.५८ आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईद यांच्यासह अन्य चार आरोपी अद्याप फरार आहेत.

दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य आरोपी मलिक याचे घर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मलिकनंतर आरोपी एजाज याचेही घर ताब्यात घेतेले आहे.एजाज अद्याप फरार आहे.या मुख्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके तपास करत आहेत.

Exit mobile version