विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेचा दिला राजीनामा!

बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांच्याकडून अद्याप राजीनामा सादर नाही

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या १२ पैकी १० खासदारांनी लोकसभेचा दिला राजीनामा!

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. आता बुधवारी भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. म्हणजेच हे नेते आता विधानसभेचे सदस्य राहतील. भाजपचा हा निर्णय एका मोठ्या रणनीतीचा भाग मानला जात आहे.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांनी संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी अशा १२ पैकी १० खासदारांनी राजीनामे सादर केले आहेत.भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने सभापतींची भेट घेऊन राजीनामा सादर केला.

हे ही वाचा:

‘प्रणब मुखर्जी म्हणायचे, राहुल गांधी हे अपरिपक्व नेते’

डोंगरावरून ४०० फूट खाली कोसळलेल्या तरुणीची सुटका

दीर्घकाळापासून रचला जात होता, इस्रायलवरील हल्ल्याचा कट!

न्यूयॉर्क शहरात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर बडगा

सभापतींना भेटलेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील उदय प्रताप सिंग, नरेंद्र तोमर, प्रल्हाद पटेल, रिती पाठक, राकेश सिंग यांचा समावेश आहे.राजस्थानमधून राजीनामे सादर करणाऱ्या खासदारांमध्ये राज्यवर्धन राठोड, किरोडी लाल मीना आणि दिया कुमारी यांचा समावेश आहे. छत्तीसगडचे खासदार अरुण साव आणि गोमती साई यांनी देखील राजीनामा सादर केला आहे.दरम्यान, बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह यांनी अद्याप राजीनामा सादर केलेला नाही.

 

 

Exit mobile version