28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी चकमक, १० नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी चकमक, १० नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद विरुद्ध हाती घेतलेली मोहीम पार पडण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांकडून सुरु आहे. २०२६ पर्यंत नक्षलवाद नष्ट करून टाकू, असे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. याच मोहिमेत छत्तीसगमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज (२२ नोव्हेंबर) सुरक्षा दलांसोबत चकमक झाली, यामध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलाने एके-४७  रायफलसह अनेक शस्त्रे जप्त केली आहेत.

शुक्रवारी पहाटे भांडारपदरच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांसाठी शोध मोहीम राबवत असताना चकमक सुरू झाली. बस्तरचे महानिरीक्षक, पी सुंदरराज यांनी पुष्टी केली की परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे, १० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, सर्व १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एके-४७ व्यतिरिक्त, सैन्याने इतर शस्त्रांसह एक इन्सास आणि एक सेल्फ-लोडिंग रायफल देखील जप्त केली आहे.

दरम्यान, या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत किमान २५७ नक्षलवादी मारले गेले आहेत, तर ८६१ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ७८९ जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

हे ही वाचा : 

अटक टाळण्यासाठी केला हॉटस्पॉटचा वापर

‘अनिल परबांच्या साई रिसोर्टला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार’

आंध्रात पहिले कंटेनर रुग्णालय सुरू

गोव्याच्या किनारपट्टीवर मासेमारी जहाजाची नौदलाच्या पाणबुडीशी टक्कर

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा