उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये होळी निमित्ताने प्रशासनाने शुक्रवारच्या नमाज आणि चौपैय्या मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या मशिदींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, होळी चौपैय्या मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या जामा मशिदीसह १० मशिदी या ताडपत्रीने झाकल्या जातील. पोलिस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
एएसपी श्रीशचंद्र म्हणाले की, संभलमध्ये होळी चौपाई मिरवणूक ज्या पारंपारिक मार्गावरून जाते त्या मार्गावर असलेली सर्व धार्मिक स्थळे दोन्ही पक्षांच्या संमतीने झाकली जातील. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच कारवाई सुरू केली जाईल. धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल. हिंदू समुदायाने दुपारी २.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम लोक नमाज पठण करतील. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मशिदी ताडपत्रींनी झाकण्यात येणार आहेत.
चौपैय्या मिरवणुकीच्या मार्गावर १० मशिदी असून त्या सर्व झाकल्या जातील. याबाबत दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा झाली असून दोन्ही बाजूंच्या लोकांनी या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. ताडपत्रींनी झाकण्यात येणाऱ्या या मशिदींमध्ये शाही जामा मशीदीचा देखील समावेश आहे. आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला संभल येथील जामा मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला आहे. आता पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होईल.
हे ही वाचा :
महू हिंसाचार: आठ गुन्हे दाखल, ५० जण आरोपी म्हणून घोषित तर १० जणांची रवानगी तुरुंगात
संभलचे सीओ अनुज चौधरी यांच्याविरुद्ध वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अबाज खानला अटक!
दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक
जुम्मासाठी होळी उत्सवात दोन तासांचा ब्रेक घ्या; दरभंगाच्या महापौरांचा अजब सल्ला
रमजान सुरू होण्यापूर्वी मशीद समितीने जामा मशिदीला रंगविण्यासाठी एएसआय आणि प्रशासनाकडून परवानगी मागितली होती. पण ते नाकारण्यात आले. त्यानंतर समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यावर हिंदू पक्षाने नाराजी व्यक्त केली. रंगकामाच्या बहाण्याने मशिदीच्या बांधकामात छेडछाड केली जाऊ शकते, असा आरोप हिंदू पक्षाने केला होता.