28 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरविशेषबीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू

बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Google News Follow

Related

मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जवळपास ४५ ते ५० प्रवासी यातून प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून बीडच्या दिशेने जात असताना आष्टा हरिनारायण येथे पहाटेच्या सुमारास वळण घेत असताना हा भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस १५० फूट घसरत खाली गेली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी आणि जामखेड येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.

ऍम्ब्युलन्सला अपघात

बीडहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एका ऍम्ब्युलन्सलाही भीषण अपघात झाला आहे. या अपघातात डॉक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे एका भरधाव ऍम्ब्युलन्सने ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला

बेस्ट गरबाचे पारितोषिक जिंकले, मात्र आयोजकांनी केली पित्याची हत्या

धुळ्यात टिपू सुलतानाचा पुतळा; आमदार फारुक शाहविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

अपघातात ऍम्ब्युलन्स चालक भरत सिताराम लोखंडे (३५ वर्ष), मनोज तिरपुडे, पप्पु तिरपुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के (३५ वर्ष) यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा