इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

तेलंगणामधील सिकंदराबाद येथे मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी पहाटे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

तेलंगणामधील सिकंदराबाद येथे मंगळवार, १३ सप्टेंबर रोजी पहाटे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागून ही दूर्घटना घडली असून यामध्ये यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी असल्याची देखील माहिती आहे.

सिकंदराबादमध्ये रूबी लॉज नावचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या तळमजल्यवर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गाडीच्या बॉटरीचा स्फोट झाला आणि आग लागली. ही आग काही क्षणात वर असलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेमधील नागरिकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले होते.

काही नागरिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या. मात्र, जे हॉटेलमध्ये अडकले अशा काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या सहा असून जखमी नागरिकांवर उपचार सुरू आहेत. आग आणि धुरामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथे २० ते २५ लोक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी

“शरद पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह”

घटनेनंतर मंत्री टी श्रीनिवास यादव, गृहमंत्री महमूद अली आणि हैदराबाद शहर पोलिस आयुक्त आनंद यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामध्ये कुणी अडकले आहेत का? याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

Exit mobile version