गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने २४ तासात १० जणांचा मृत्यू!

मृतांमध्ये किशोरांपासून ते मध्यमवयीन लोकांचा समावेश

गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने २४ तासात १० जणांचा मृत्यू!

गेल्या २४ तासांत गुजरातमधील विविध भागात नवरात्रोत्सवात गरबा खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांमध्ये किशोरांपासून ते मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे यामध्ये बडोदा येथील सर्वात लहान १३ वर्षीय दाभोई मुलाचा समावेश आहे.

देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.नवरात्री उत्सवात लाखो तरुण, तरुणी तसेच मध्यमवयीन लोक रंगेबेरंगी कपडे परिधान करून गरबा खेळण्यासाठी उत्सुक असतात.मात्र, गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात २४ तासात हृदयविकाराच्या झटक्याने १० जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये अल्पवयीन ते मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अहमदाबादमधील २४ वर्षीय तरुण गरबा खेळत असताना अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.तसेच कपडवंज येथील एका १७ वर्षीय मुलाचाही गरबा खेळताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची हुर्यो!

आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!

मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!

राज्यामध्ये गरबा सुरूझाल्यापासून आपत्कालीन रुग्णवाहिकेसाठी (१०८) ज्या लोकांनी कॉल केला त्याची तपासणी करण्यात आली.यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या सहा दिवसांत हृदयाशी संबंधित समस्यांसाठी ५२१ कॉल आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी अतिरिक्त ६०९ कॉल आल्याचे उघडकीस आले.हे कॉल्स संध्याकाळी ६ ते पहाटे २ च्या दरम्यान रेकॉर्ड केले गेले, म्हणजे जेव्हा गरबा खेळायला सुरुवात केली जाते.या चिंताजनक प्रवृत्तीमुळे सरकार आणि कार्यक्रम आयोजक दोघांनीही कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे.

राज्य सरकारने गरबा स्थळांजवळील सर्व सरकारी रुग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना (CHCs) अलर्ट जारी करत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यक्रमात त्वरीत प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना गरबा आयोजकांना देण्यात आल्या आहेत.शिवाय, गरबा आयोजकांनी कार्यक्रमस्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात करून सहभागींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पावले उचलली आहेत.

Exit mobile version