नाशिकमध्ये बसला आग लागली १० होरपळले

नाशिक खासगी बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे.

नाशिकमध्ये बसला आग लागली १० होरपळले

नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. नाशिक- औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा अपघात झाला आहे.

यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात या बसला पहाटे ४.२० च्या दरम्यान आग लागली. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसला आग लागली, अशी माहिती समोर आली आहे. तसेच अपघातानंतर यंत्रणांकडून तातडीने मदत मिळाली नसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांनी धाव घेतली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात खासगी बस जळून खाक झाली आहे. अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

सिरीज पाहून बँक मॅनेजरनेच केली बँकेत चोरी

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी रुग्णांना उपचारात कोणती कमी होता कामा नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ही घटना गंभीर असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Exit mobile version