तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये बंद

तामिळनाडूत पावसाचा तडाखा, १० जणांचा मृत्यू!

तामिळनाडूचे मुख्य सचिव शिव दास मीणा यांनी मंगळवारी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत दक्षिणेकडील जिल्ह्यांतील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे.सततच्या पावसामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शिव दास मीणा म्हणाले की, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुसळधार पावसाचा वर्तवलेला अंदाज चुकीचा ठरला. जिल्ह्यामध्ये दोन दिवसात पावसाने हाहाकार माजवला.पावसामुळे तिरुनेलवेली आणि तुतीकोरीन जिल्ह्यांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काहींचा मृत्यू भिंत कोसळल्याने तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला, असे शिव दास मीणा यांनी पत्रकारांना सांगितले.

पावसाबद्दल काही तपशील देताना ते म्हणाले की, दक्षिणेकडील जिल्हे, विशेषतः तिरुनेलवेली आणि तुतीकोरीनमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे.दरम्यान, तिरुनेलवेलीचे जिल्हाधिकारी केपी कार्तिकेयन यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीची माहिती दिली आणि सांगितले, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

यवतमाळमध्ये जावयाने पत्नी, सासरा आणि दोन मेहुण्यांना संपवलं

८०० रेल्वे प्रवाशांची ४८ तासांनी सुटका

‘राहुल गांधी यांना बाहेर काढण्याचे चक्रव्यूह’

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर थिरुनेलवेली आणि तेनकासी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे थुथुकुडी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.या जिल्ह्यांमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे.दक्षिण रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये नागरकोइल-कन्याकुमारी एक्स्प्रेस नागरकोइल-कन्याकुमारी एक्स्प्रेस एसपीएल आणि नागरकोइल-तिरुनेलवेली एक्स्प्रेस एसपीएल पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेल्याने अधिकाऱ्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे.भारतीय लष्कराचे बचाव पथक श्रीवैकुंटममध्ये पोहोचले आहे.तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मिचॉंग वादळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यासाठी आणि आपत्ती निवारण निधीची तरतूद करण्यासाठी विनंती अर्ज दिला आहे.

 

Exit mobile version