22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमणिपूरचा राग नाशिकमध्ये, १० पोलिस दगडफेकीत जखमी !

मणिपूरचा राग नाशिकमध्ये, १० पोलिस दगडफेकीत जखमी !

एकलव्य आदिवासी, वंचित बहुजन आघाडी आणि इतर स्थानिक संघटनांचा आंदोलनात सहभाग

Google News Follow

Related

मणिपूर व्हिडिओ प्रकरणाच्या विरोधात देशभरात विरोध दर्शवला जात आहे.या घटनेचा निषेध करत शनिवारी, (२९ जुलै) रोजी, महाराष्ट्रातील नाशिक येथे आंदोलन करण्यात आले.मात्र, पोलिसांनी आंदोलकांना विरोध केल्याने आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत किमान १० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दगडफेकीनंतर पोलिसांनी सुमारे ३० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

 

मणिपूर हिंसाचाराच्या वेळी दोन महिलांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओविरोधात आंदोलक आंदोलन करत होते. शनिवारी (२९ जुलै) रोजी नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एकलव्य आदिवासी संघटना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर स्थानिक संघटनांचा सहभाग होता. हजारो तरुण शर्ट न घालता आंदोलनात सहभागी झाले आणि निषेध म्हणून मोर्चा काढला. तहसील कार्यालयात पोहोचल्यावर काहींनी सटाणा पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.

 

पोलिसांनी आंदोलकांना सांगितले की, त्यांच्याकडे धरणे आंदोलनाची परवानगी नाही. शिवाय, आमदार मुंबईतील विधानसभेच्या अधिवेशनाला उपस्थित असल्याने निवेदन स्वीकारू शकत नसल्याची माहिती पोलिसांनी आंदोलकांना दिली. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद आणि बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिस कर्मचारी आणि परिसरातून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनी त्यांचे शटर खाली करून दुकाने बंद केली.

 

हे ही वाचा:

कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये वाद वाढल्याने आंदोलकांनी पोलीस कर्मचारी आणि भागातील गाड्यांवर दगडफेक केली.आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलीस अधीक्षक शहाजी यांनी पीटीआयला सांगितले की, “या घटनेत दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दगडफेक करणाऱ्या २१ जणांना आम्ही ताब्यात घेतले आहे. निषेध मोर्चानंतर ही घटना घडली. अतिरिक्त फौजफाटा तातडीने पाचारण करण्यात आला. आता परिस्थिती शांत आहे.”

 

काही दिवसापूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून विवस्त्र केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता.या व्हिडिओ नंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या. पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेची दखल घेत या प्रकरणातील आरोपीना पकडून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मणिपूर हिंसाचार सुरू झाल्याच्या एका दिवसानंतर ४ मे रोजी ही घटना घडली. याची पहिली नोंद १८ मे रोजी झाली होती. या प्रकरणी दोन एफआयआर नोंदवण्यात आले होते, त्यापैकी दुसरी २१ जून रोजी सायकुल पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आले असून हे प्रकरण आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा