मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज बैठक

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबवण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी (१७ नोव्हेंबर) निदर्शने आणि हिंसाचारादरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य पाहता जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी जिरीबाम जिल्ह्यात गोळीबार केला आणि यामध्ये के अथौबा नावाच्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. बाबुपारा येथे रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

जमावाकडून याच भागातील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यालयांची तोडफोड केली कार्यालयातील फर्निचरला आग लावली. जिरीबाम पोलीस ठाण्याच्या ५०० मीटर परिसरात हा हिंसाचार झाला. जिल्ह्य़ात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’; ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू

व्होट जिहादकरून मतं मागतील तर मतांचं धर्मयुद्ध करावे लागेल, नाहीतर जगू देणार नाहीत

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज ( नोव्हेंबर) मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत  सविस्तर बैठक घेणार आहेत. गृह मंत्रालयाच्या ईशान्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्सचे अधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version