ठाण्यातील महापालिका रुग्णालयात दाखल होण्यासाठी घेतले १ लाख

ठाण्यातील महापालिका रुग्णालयात दाखल होण्यासाठी घेतले १ लाख

ठाण्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. महापालिकेच्या एका रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करुन घेण्यासाठी १ लाखांची रक्कम मागण्यात आलेली आहे. ठाणे येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे. रुग्णालयामध्ये रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल रुग्णाच्या मुलीने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता प्रकाराबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

ग्लोबल रुग्णालय हे महापालिकेचे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. याआधी सुद्धा एका रुग्णाकडून दीड लाखांची मागणी करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण समोर आले होते. परंतु लगेच आता हे प्रकरण समोर आल्याबरोबर रुग्णालायाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत.

हे ही वाचा:

दोन दिवसांच्या गोंधळानंतर पाच टप्प्याचा अनलॉक जाहीर

जुही चावलासह अन्य फिर्यादींना ठोठावला २० लाखांचा दंड

बीएमसीचे ग्लोबल टेंडर हा घोटाळाच

महाराष्ट्रातील कोरोनाबळींची संख्या ९७ हजारांपेक्षा अधिक

याआधी तक्रार नोंदवल्यानंतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच रुग्णालयातील एका डॉक्टरला अटक केली होती. आताही हे असेच प्रकरण उघडकीस आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे. दादरमधील एका महिलेच्या वडिलांना दादरमधून ठाण्यात आणले होते. रुग्णशय्या न मिळाल्याने त्यांना ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात आणले होते. दाखल करून घेण्यासाठी त्यावेळी एक लाख रुपये घेतले. त्यावेळी या महिलेने दहा हजार रुपये ऑनलाइनद्वारे भरले. उरलेले ९० हजार रुपये रुग्णालयाबाहेरील परिसरात एका डॉक्टरला दिले होते. एकूणच महापालिका रुग्णालयात घडलेल्या या प्रकारामुळे सामान्य माणसाने नेमके काय करायचे असाच प्रश्न उपस्थित झालेला आहे

Exit mobile version