जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू!

१२ पर्यटक जखमी, सुरक्षा दलांकडून शोधकार्य सुरु 

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू!

जम्मू-काश्मीरमधून पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहलगाम येथील बैसरन येथे ही गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि बारा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये चार जण राजस्थानचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेकिंग ट्रिपसाठी गेलेल्या पर्यटकांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की हा हल्ला दुपारी अडीच वाजता झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते. बैसरन खोऱ्यात घोडेस्वारीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर दोन ते तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.

सुमारे ३ ते ५ मिनिटे गोळीबार केला. यानंतर ते तिथून पळून गेले. या हल्ल्यात १२ पर्यटक जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना अनंतनागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हल्लेखोर दहशतवादी पोलीस युनिफॉर्ममध्ये असल्याची माहिती समोर आलीये.
हे ही वाचा : 
खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा
संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!
“फलंदाजी नाही, दिशा नाही… मग जिंकायचं तरी कसं?
मोठं स्वप्न बघण्यासाठी पंतप्रधान मोदी देतात प्रेरणा!
बाहेरून आलेल्या पर्यटकांवर हा ठरवून हल्ला करण्यात आला. याचे प्रमुख कारण म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी व्हावी आणि त्यांच्यामध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे समजते आहे. या घटनेनंतर भारतीय लष्कराच्या व्हिक्टर फोर्स आणि स्पेशल फोर्सेस, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी आणि सीआरपीएफने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

 

बिरबलाची खिचडी शिजायला ठेवलीय पानंही घेतलीत ! | Mahesh Vichare | Raj Thackeray | Uddhav Thackeray |

Exit mobile version