28 C
Mumbai
Wednesday, November 20, 2024
घरविशेषजम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला!

जम्मू काश्मीरच्या पुंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला!

एका जवानाचा मृत्यू; चार जखमी

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांच्या एका वाहनावर गोळीबार केला.

सुनरकोटमधील सनाई गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली असून लष्कर आणि पोलिसांना तेथे पाठवण्यात आल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसरात नाकाबंदी केली असून तपासमोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहनांना शाहसितारजवळील हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

जम्मू-कश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात घनदाट जंगलाच्या मध्यभागी डोंगराच्या रस्त्यावरून जात असलेल्या हवाई दलाच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षारक्षक यांच्यात चकमक उडाली. जखमी झालेल्या पाच जणांना जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे एकाचा मृत्यू झाला.

‘पुंछच्या सनई सत्तार गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेजवळ लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) आणि आयएएफच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले,’ असे एका अधिकृत सूत्राने सांगितले. हा ताफा जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनईच्या दिशेने जात होता. पुंछ सेक्टरमध्ये तैनात केलेल्या रडारवर काही तांत्रिक काम केल्यानंतर हा ताफा परतीच्या वाटेवर होता.

हे ही वाचा:

‘कॅनडा आमच्यावर आरोप करते, पण पुरावे देत नाहीत’

सुनील गावस्कर कोहलीवर बरसले!

गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!

कथित अनुचित कपडे परिधान करून व्हिडीओ

७ मे रोजी होणाऱ्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातील मतदान विस्कळीत करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. निवडणुकीसाठी परिसरातील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पूंछमध्ये सैन्याने शोध मोहीम राबवली होती. सांबा सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी सीमेवर संभाव्य घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि एका घुसखोराला ठार केले. अनेक सीमावर्ती गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी पुंछ जिल्ह्यात लष्कराच्या दोन वाहनांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. अवघ्या महिनाभरापूर्वी, राजौरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना पाच जीवघेण्या घटनांचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्षी २० एप्रिल रोजी पूंछ जिल्ह्यातील भाटा धुरियन येथे लष्करी ट्रकवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते, तर ११ ऑगस्ट रोजी लगतच्या राजौरी जिल्ह्यात लष्कराच्या छावणीवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.
एक दशकापूर्वी जम्मू काश्मीर दहशतवादमुक्त घोषित केले, परंतु ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२४ या काळात झालेल्या हल्ल्यांमध्ये २६ सैनिकांसह ३५ मृत्यूंची नोंद झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा