बिहारमधील सुपौल येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे.कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या रोड ब्रिजचा एक भाग कोसळला आहे.या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सुपौलचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी सांगितले की, या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य १० जण जखमी झाले आहेत.जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, असे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘जावेदने साजिदला माझ्या घरी आणले; त्याची आमच्यासमोर चौकशी करा’
कोइम्बतूरमधून अण्णामलाई यांना उमेदवारी देण्यामागे भाजपचा उद्देश काय?
स्मार्टफोन बाजारात एकाधिकारशाही निर्माण केल्याचा ऍप्पलवर आरोप!
या दुर्घटनेत अनेक २० हुन अधिक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.ग्रामस्थांच्या मदतीने अनेक जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.विशेष म्हणजे देशातील सर्वात लांब असणारा हा ब्रिज आहे.अशा प्रकारच्या घटनांमुळे बांधकामावर देखील प्रश्न उपस्थित होतो.
सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा यांना जोडणारा हा देशातील सर्वात लांब (१०.२ किमी) पूल बांधण्यात येत आहे.केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून ११९९ कोटी ५८ लाख रुपये खर्च करून हा महासेतू बांधण्यात येत आहे.भारत माला प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेला हा पूल केंद्र सरकारच्या मोठ्या योजनांपैकी एक आहे.पुलाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर आहे.दरम्यान, पुलाचे बांधकाम २०२३ पर्यंत पूर्ण करायचे होते, परंतु कोरोना आणि पुरामुळे पुलाच्या बांधकामाचा कालावधी वाढला.