मुंबई उपनगरीय लोकल सेवेमध्ये मोठा गाजावाजा करत सामील झालेली वातानुकूित लोकल रेल्वे आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पसंतीस पडताना दिसत आहे. मात्र हीच वातानुकूलित रेल्वेलोकल बदलेलेल्या वेळापत्रकावरून कधीकाळी प्रवाशांच्या नापसंतीस पडलेली दिसत होती. आता मात्र पश्चिम रेल्वेवरील वातानुकूित लोकल गाडीला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद दिसत आहे. ऐन उकाड्यात एप्रिल २००० पासून ते आतापर्यंत १ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मागील वर्षी २०१९-२० च्या तुलनेत या वर्षी ८५ टक्के प्रवासी वाढले आहेत. प्रथम वातानुकूलित लोकल रेल्वे पश्चिम मार्गावर डिसेंबर २०२१ मध्ये आली. या वातानुकूलित रेल्वे लोकलला अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रवासी भाडे कमी करण्यात आले. त्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढत गेला. पश्चिम रेल्वेवर ४८ वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या होतात. मात्र प्रवाशांचा वाढत प्रतिसाद पाहणारा १ ऑक्टोबर पासून आणखी ३१ फेऱ्या वाढवण्यात आले. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित रेल्वेच्या एकूण ७९ फेऱ्या दररोज चालू आहे.
हे ही वाचा:
कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल
मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ
बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी
एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी
प्रवाशांचा एकूण प्रतिसादापैकी सर्वाधिक सप्टेंबर महिन्यात तिकीट विक्री १५ हजार ७८९ झाली होती. लोकल फेऱ्या वाढल्यानंतर दररोज १९ हजार तिकीटे विकली जात आहेत. तसेच प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी मोटरकोच डब्यातील बसवलेली उपकरणे लोकलच्या डब्यात बसवलेली पहिली वातानुकूलित लोकल लवकरच पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान मध्य रेल्वेच्या वातानुकूलित रेल्वेच्या एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात ७२ लाख ३२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली आहे