व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती

व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील आरोपी सिराज मोहम्मदचे दुबईत व्यवसायांचे जाळे

मालेगाव व्होट जिहाद फंडिंग प्रकरणातील मुख्य सुत्रधार सिराज मोहम्मद हारुण मेमन याच्या बद्दल मोठी माहिती समोर आली आहे. आरोपीचे दुबईमध्ये ५ बिझनेस फर्म/बँक खाती आणि भारताच्या बँक खात्यांसोबत १०० कोटींचे व्यवहार. तसेच आरोपीचा व्होट जिहाद सहकारी सलमान सलील मिर्झाला (एम के एंटरप्राइझ) ३७ कोटी ८८ लाख रुपये वितरीत केल्याचे समोर आले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत माहिती दिली.

किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत म्हटले, भारतातील २१ राज्यांतील २०० हून अधिक बँक खात्यांमधून मालेगाव येथील सिराज मोहम्मद याच्या बेनामी खात्यात २५२ कोटी वितरीत करण्यात आले. या पैशांचा वापर व्होट जिहाद आणि बांगलादेशी रोहिंग्याना मुंबईत धाडण्यासाठी वापरला जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

हे ही वाचा : 

मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात

सुनियोजित पत्रकार परिषदेत अदाणींनी केली राहुल गांधीची सुटका…

अतुल भातखळकरांची ‘विजय संकल्प रॅली’, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा सहभाग!

खर्गेंच्या जिल्ह्यात सोयाबीनला भाव ३,८०० रु आणि काँग्रेस म्हणते, महाराष्ट्राला सात हजार देवू!

तसेच मालेगाव येथील विविध व्होट जिहाद एजंटना रोख स्वरूपात ५८ कोटी वितरीत केल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत म्हटले. मालेगाव येथे ३५ बेनामी खाती उघडण्यात आली आहेत, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक मालेगाव, बँक ऑफ महाराष्ट्र मालेगाव, आयसीआयसीआय बँक मालेगाव या ठिकाणी ही खाती आहेत. व्होट जिहादसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांत हवालामार्फत आणि रोखीच्या माध्यमातून २०० कोटींहून अधिक पैसे काढल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Exit mobile version