पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना घेवून जाणाऱ्या वाहनावर हल्ला, ५० जण ठार!

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

पाकिस्तानमध्ये शिया मुस्लिमांना घेवून जाणाऱ्या वाहनावर हल्ला, ५० जण ठार!

पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा येथे शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी वाहनावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ५० जण ठार झाल्याची माहिती आहे, तर २० हून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अलीकडच्या काळातला हा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे.

खैबर पख्तूनख्वा प्रांताचा भाग असलेल्या कुर्रम जिल्ह्यात हा हल्ला झाला. या जिल्ह्यात अलीकडे शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील जातीय घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाराचिनारहून पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर गोळीबार केला. पोलीस अधिकारी अजमत अली यांनी सांगितले की, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात किमान १० प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नाही.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि पीडितांच्या कुटुंबियांना शोक व्यक्त केला. हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हे ही वाचा : 

उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोर्टाकडून समन्स, १६ डिसेंबरला हजर राहण्याचे निर्देश!

पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता
भाजपला मतदान करणार होती म्हणून तिची हत्या केली
Exit mobile version