मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई, ११ अतिरेकी मारले!

एक जवान जखमी

मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई, ११ अतिरेकी मारले!

मणिपूरमध्ये सीआरपीएफने मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबाममध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफने ११ अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे, त्याला उपचारासाठी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरच्या जिरीबाममध्ये सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारी ३.३० च्या सुमारास सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्यानंतर ही चकमक झाली. छावणीवरील हल्ल्यानंतर, सीआरपीएफने प्रत्युत्तर दिले आणि ११ कुकी अतिरेक्यांना ठार केले आणि त्यांच्या ताब्यातून अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. या घटनेत एक सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहता परिसरात सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहिमही सुरु आहे.

हे ही वाचा : 

अमित शहांच्या उपस्थितीत बोरीवलीत महायुतीच्या उमेदवारांसाठी ‘विजयी शंखनाद’

आदिवासी मुलींशी लग्न करणाऱ्या घुसखोरांना आता जमीन मिळणार नाही!

बॅगेची तपासणी होताच उद्धव ठाकरेंची आग-आग

भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा आर्यन झाला अनया!

दरम्यान, याआधी गेल्या तीन दिवसांत मणिपूरच्या डोंगरी आणि खोऱ्यात सुरू असलेल्या शोध मोहिमांमध्ये सुरक्षा दलांनी अनेक शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी जप्त केले आहेत. शनिवारी आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रायफल, दोन ९ एमएम पिस्तूल, सहा १२ सिंगल बॅरल रायफल, दारूगोळा आणि युद्धाशी संबंधित इतर वस्तू जप्त केल्या आहेत.

Exit mobile version