पुणे जिल्हा न्यायालयात आयोजित एका भूमिपूजन समारंभात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक म्हणाले, न्यायपालिकेच्या आवारात कोणतीही पूजा, अर्चना करू नये, कायदे मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मानसिकता अंगिकारली पाहिजे. धार्मिक विधीऐवजी मुख्य घटनात्मक तत्वावर जोर द्यायला हवा. न्यायपालिकेशी संबंधित कोणत्याही कार्यक्रमादरम्यान पूजा, अर्चना, दिवे लावणे हे बंद करावे लागेल. त्या ऐवजी कोणत्याही घटनेची सुरुवात करण्यासाठी संविधानाची प्रस्तावना पळून त्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे, असे ते म्हणाले.यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि पुण्याचे पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे उपस्थित होते.
हेही वाचा..
पंजाब: काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांना पोलिसांकडून अटक!
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यास ऑल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरकडून संरक्षण
वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?
सचिन तेंडुलकर यांनी सांगितले स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे फायदे
यावेळी बोलताना न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी न्यायमूर्ती अभय ओक यांच्या भूमिकेला सहमती दर्शवली. ते म्हणाले, न्यायमूर्ती ओका यांनी खूप चांगली सूचना केली आहे.विशिष्ट धर्माची पूजा करण्याऐवजी आपण कुदळीने पाया खूण केला पाहिजे. आमचे सहकारी अनिल किल्लोरे यांनी सुचविल्याप्रमाणे दीपप्रज्वलनाऐवजी रोपांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले पाहिजे. पर्यावरणाच्या दृष्टीने समाजात एक चांगला संदेश जाईल.मला वाटते की जर न्यायाधीश म्हणून आपल्यात रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखा धाडसी आणि पक्षपाती स्वभाव असेल तर जामीन देण्याची भीती का वाटावी? आजकाल जिल्हा न्यायालयात जामीन मिळत नाही, अशी परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान एका आठवड्यात धार्मिक संबंधाबाबत न्यायव्यवस्थेकडून ही दुसरी टिपण्णी आहे. २८ फेब्रुवारी रोजी माजी न्यायमूर्ती जोसेफ यांनी सुचवले की सर्वोच्च न्यायालयाचे बोधवाक्य राष्ट्रीय बोधवाक्य आणि अर्थानुसार, राष्ट्रीय नीतिमत्तेपासून वेगळे आहे. “सत्य हेच संविधान आहे. धर्म नेहमीच सत्य नसतो. धर्म म्हणजे काळाच्या गरजेनुसार तुमचे कर्तव्य पार पाडणे होय, असे ते म्हणाले होते. विशेष म्हणजे २०१८ मध्ये एका चर्चासत्रात माजी न्यायमूर्ती जोसेफ यांनी २०१८ मधील कॅथोलिक चर्चची भारताच्या प्रस्तावनेशी बरोबरी केली. कॅथोलिक चर्चने नेहमीच जगभरातील विश्वासूंनी आणलेल्या सर्व परंपरा आणि संस्कृती स्वतःमध्ये आत्मसात केल्या आहेत. हे ‘आम्ही’ या शब्दाने सुरू होणाऱ्या आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेसारखेच आहे. एक व्यक्ती जी या चर्चला एकाच अस्तित्वात ठेवते तो पोप आहे, असे ते म्हणाले होते.