25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषविमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू

विमानाच्या धडकेत ४० फ्लेमिंगोंचा मृत्यू

मुंबईतील प्रकाराने खळबळ

Google News Follow

Related

सोमवारी मुंबईच्या घाटकोपरमध्ये एमिरेट्सच्या विमानाने फ्लेमिंगोच्या थव्याला धडक दिल्याने किमान ४० फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले. हा प्रकार घडला असला तरी दुबईहून येणारे हे विमान सुखरूप उतरले. मुंबईतील पंतनगर येथील लक्ष्मी नगर परिसरात ही घटना घडली.

दुबईला जाणारे परतीचे उड्डाण सोमवारी रात्री उशिरा रद्द करण्यात आले कारण विमानाची पूर्ण तपासणी करण्यात आली होती. हा प्रकार घडल्यामुळे मुंबई विमानतळावर अनेक प्रवासी अडकून पडले. एमिरेट्स फ्लाइट ५०९ दुबईसाठी आता मंगळवारी रात्री ९ वाजता निघेल. प्रवाश्यांना विमान कंपनीने राहण्याची सोय केली आहे.
महाराष्ट्र वनविभागाने या घटनेचा तपास सुरू केला असून अधिकाऱ्यांनी नमुने गोळा केले आहेत. वनविभागाचे दुसरे पथक अमिराती विमान उडवणाऱ्या वैमानिकाचे जबाब नोंदवणार आहे.

हेही वाचा..

‘जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी सापडले पुरातन शिवमंदिर’

भाजपा मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ‘आप’ कार्यकर्त्यांवर एफआयआर!

७७ वर्षातील ऐतिहासिक घटना; निकोबारमधील शोम्पेन समाजाने पहिल्यांदा केलं मतदान

बारावीच्या निकालात मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के

आमची टीम जमिनीवर आहे आणि फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या वैमानिकाने पक्षी मारल्याची माहिती दिली, त्याचे जबाबही आम्ही नोंदवू, असे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव यांनी सांगितले.

विमानतळाच्या आजूबाजूला असा अपघात कधीच झाला नसल्याचे रामाराव म्हणाले. फ्लेमिंगोचा थवा ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याच्या दिशेने जात असताना विमानाची धडक बसल्याचे समजते. बांधकाम किंवा प्रदूषणामुळे फ्लेमिंगोने उड्डाणाचा मार्ग बदलला असावा, असे सांगण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा