महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी आणि उत्साहवर्धक ठरेल, असे एक उद्योजक या नात्याने मला वाटते. कारण कोणत्याही राज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगती ही शासकीय धोरणांच्या स्थिरतेवर अवलंबून असते आणि धोरणे स्थिर राहण्यासाठी तेथील राजवट मजबूत असावी लागते. केंद्रात व महाराष्ट्रात पुढील पाच वर्षे एकाच आघाडीचे, एकविचाराने चालणारे आणि विकासाभिमुख सरकार काम करणार असल्याने आगामी काळात अस्थिर सरकार, तडजोडीचे सरकार किंवा राष्ट्रपती राजवट अशा आव्हानांचा मुकाबला करावा लागणार नाही आणि विकासासाठी केंद्रीय निधीचीही कमतरता भासणार नाही, हे खूप आश्वासक आहे, अशी प्रतिक्रिया मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली.
डॉ. दातार म्हणाले, महायुतीच्या गेल्या शासनकाळात राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात प्रगतीची व्यापक आणि वेगवान पावले पडलेली दिसली आहेत. त्याच दमदार वाटचालीचा पुढचा टप्पा भविष्यकाळातही कायम राहील. पायाभूत सुविधा विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ततेच्या टप्प्यात आहेत.
हेही वाचा..
राऊतांनी ठाकरेंच्या नेत्यांना अक्कल पाजळावी अन पवारांच्या दारासमोर पाहणीच्या भूमिकेत राहावं!
मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!
मशिदीच्या सर्वेक्षणावरून यूपीच्या संभलमध्ये तणाव, दगडफेक, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या!
विकास, उत्तम प्रशासनाचा आणि परिवारवादाला मूठमाती देणारा हा विजय
त्यातील काही महाराष्ट्राइतकेच देशाच्या भरभराटीसाठीही महत्त्वाचे आहेत. समृद्धी महामार्ग, मेट्रो, बुलेट ट्रेन, नवे रस्ते व रेलमार्ग बांधणी तथा विद्यमान मार्गांचा विस्तार, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित वाढवण बंदर ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्रात गुंतवणूक, वाहतूक, आयात-निर्यात, औद्योगिक विकास यांना पुढील पाच वर्षांत जोरदार चालना मिळेल, ज्याचा परिणाम राज्याची आर्थिक भरभराट होण्यावर होईल, असे डॉ. दातार म्हणाले.