भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा शुक्रवारी रांचीमध्ये इंग्लंडविरोधात चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी डीआरएस रिव्ह्यूदरम्यान कॅमेरामनवर नाराज दिसला. हा कॅमेरामन रिव्ह्यूदरम्यान सातत्याने रोहित शर्मा याला मोठ्या पडद्यावर दाखवत होता. यावर नाराज होऊन रोहितने त्याला रिप्ले दाखवण्याचा सल्ला दिला.
रवींद्र जाडेजाचा चेंडू इंग्लंडचा फलंदाज बेन फॉक्स याच्या पॅडवर लागला. पंचांनी त्याला नाबाद जाहीर केले. मात्र रोहित शर्मा याने डीआरएस रिव्ह्यू घेऊन पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र तिसऱ्या पंचानेही बॉल ट्रॅकिंगवर फोक्सला नाबाद ठरवले. मात्र जेव्हा रिव्ह्यूचा निर्णय घेतला जात होता, तेव्हा कॅमेरामन मोठ्या पडद्यावर सातत्याने रोहितला दाखवत होता. काही वेळानंतर रोहितने आपली अस्वस्थता व्यक्त केली आणि कॅमेरामनला रिप्ले दाखवायला सांगितले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा :
इराणचा पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक
पंजाबच्या शेतांत काम करणारे शेतकरी आंदोलनात सहभागी का नाहीत?
मुख्यमंत्री शिंदेंना धमकीचा संदेश देणाऱ्याला पुण्यातून घेतले ताब्यात
उत्तर प्रदेशात ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडून भीषण अपघात; १५ भाविक ठार
इंग्लंडच्या संघाने लंच ब्रेकपर्यंत पाच विकेट गमावून ११२ धावा केल्या होत्या. तेव्हा बेन फोक्सने क्रीझवर जो रूटच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्यामध्ये फोक्सचे योगदान भलेही ४७ धावांचे असेल, परंतु ते इंग्लंडसाठी महत्त्वाचे होते. रूटने यावेळी आपल्या कारकिर्दीतले ३१वे कसोटी शतक रांचीत ठोकले. तो दिवस संपेपर्यंत १०६ धावांवर नाबाद खेळत होता.