रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखणारा नवा व्हिडीओ आला समोर

रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखणारा नवा व्हिडीओ आला समोर

दिल्लीतील इंद्रलोक परिसरात अनेक मुस्लिम रस्त्यावर नमाज अदा करतानाचा व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये एक अधिकारी येतो आणि नमाज पढणाऱ्या एका व्यक्तीला लाथ मारतो आणि रागाने त्याला हलण्यास सांगतो, असे दृश्य दिसते. शुक्रवारी (८ मार्च) रोजी हा व्हिडीओ समोर आला होता. मात्र आता या व्हिडीओ सर्व भाग समोर आला आहे. त्यामध्ये असे दिसते की रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिम समाजातील लोकांना रस्त्यावर नमाज पडू नये यासाठी अनेकवेळा आवाहन केले होते. हे आता समोर आल्यानंतर नेटीझन्स कडून आता त्या पोलीस अधिकाऱ्याला जोरदार पाठींबा मिळत आहे. ८ मार्च रोजी व्हायरल झालेला हा व्हिडीओ ३४ सेकंदाचा होता. आता जो व्हिडीओ समोर आला आहे तो १ मिनिट ४४ सेकंदाचा आहे.त्यात पोलीस अनेकांना रस्त्यावर नमाज न पडण्याचे आवाहन करतानाचे दिसत आहे.

हेही वाचा..

नीरव मोदीने ८० लाख डॉलर बँक ऑफ इंडियाला देण्याचे आदेश

मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…

दिव्यांग महिलांसाठी अत्याधुनिक शिलाई मशिन्स

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा व्हिडिओ समोर

या व्हिडीओ मध्ये मुस्लीम समाजातील लोकांनी पोलिसांच्या इशाऱ्याला बगल देत रस्त्यावर नमाज अदा करण्याची तयारी सुरू ठेवली. यानंतर, पोलिस अधिकारी प्रथम त्यांना धक्काबुक्की करताना आणि नंतर वारंवार इशारे देऊनही नमाज अदा करणाऱ्या दोघांना लाथ मारताना दिसत आहेत. पोलिसांनी त्या व्यक्तीला मारहाण केल्यानंतर मुस्लिम जमाव भडकला आणि त्यांनी पोलिसांना घेरले आहे. त्यानंतर जमाव आणि पोलिसांच्यात वादावादी झाली. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी तथाकथित शिस्तभंगाच्या कारवाई अंतर्गत संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले होते.

तथापि, हा नवीन व्हिडिओ समोर आल्याने आणि मुस्लिम जमाव प्रथमतः पोलिसांची अवज्ञा करत असल्याचे स्पष्ट झाल्याने नेटिझन्स आता दिल्ली पोलिस आणि नमाज अदा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्याच्या समर्थनात उतरले आहेत. एका एक्स वापरकर्त्याने अशी पोस्ट केली आहे की,देवाचे आभारी आहे की हा व्हिडिओ दाखवत आहे की रस्त्यावर नमाज अदा करण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मी भारताच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी जमावासमोर आत्मसमर्पण करू नये आणि त्यांचा निलंबन आदेश रद्द करावा. अन्यथा आम्ही इतर प्रत्येक पोलिसाला कारवाई न करण्यास उद्युक्त करू. अशा प्रकारच्या अनेक पोस्ट समाज माध्यमामध्ये करण्यात आल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत.

 

Exit mobile version