मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोविड लसीचा दुसरा डोस

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोविड विरुद्धच्या लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी जे जे रुग्णालयात दुसरा डोस घेतला.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी ११ मार्च रोजी कोविडच्या लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर २८ दिवसांनी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. या बद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

लसींचं राजकारण बंद करा

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

जेव्हा अजित दादाच मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लसीचा दुसरा डोस घेतला होता. राज्यात शरद पवारांनी देखील काही दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी लसीचा दुसरा डोस घेतला.

सध्या महाराष्ट्रात रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केंद्र सरकारकडून लोकांना लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याबरोबरच सध्या मुख्यमंत्र्यांकडून कोरोनाबाबत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

या निर्बंधांनुसार महाराष्ट्रात शुक्रवार पर्यंत काही दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत शनिवार- रविवार वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी याविरुद्ध आंदोलन करायला देखील सुरूवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारच्या या निर्णयावरून ठाकरे सरकारवर कठोर टिका केली होती. त्यावेळी त्यांनी लसीकरणावरून चाललेले राजकारण, रेमडेसिवियरचा काळाबाजार यावरून देखील सरकारला लक्ष्य केले होते.

Exit mobile version