मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट वॉर्ड (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल वॉर्ड(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर, टिळक नगर) या चार वॉर्ड मध्ये रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. या वॉर्डमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येत १० ते १५% वाढ होताना दिसत आहे. चेंबुर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्ण संख्यावाढीचा दर सर्वाधिक ०.२६% इतका आहे.
हे ही वाचा:
९८% रुग्णसंख्या वाढीच्या केस इमारतींच्या भागातून येत आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या रहिवासी इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईतील विविध भागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, विवाह कार्यालये, बाजार, गर्दीच्या जागा अशा ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच इमारतीत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रीनिंग करण्याच्या आणि कमीत कमी लोकांना इमारतीत प्रवेश देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. एम वेस्ट वॉर्ड मध्ये एकूण 550 इमारतींना नोटीसा देण्यात आल्या.
मुंबईत सध्या एकूण ८१० इमारती सील केल्या आहेत. यापैकी टी वॉर्ड (मुलुंड) मध्ये सर्वाधिक १७० इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत सध्या सक्रीय कंटेंटमेंट झोनची संख्या ही ७६ वर जाऊन पोहोचली आहे.