पाचवेळा आयपीएविजेता संघ ठरलेल्या मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावरील दबाव वाढू लागला आहे. मुंबईने या हंगात सलग तिसऱ्या पराभवाची नोंद केली. घरच्या-वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने मुंबईला सहा विकेट राखून पराभवाची धूळ चाखली.
मुंबईने ठेवलेले १२६ धावांचे सोपे लक्ष्य राजस्थानने १५.३ षटकांतच पार केले. राजस्थानच्या रियान परागने ३९ चेंडूंतील ५४ धावांची नाबाद खेळी करून मुंबईचा पराभव केला. या विजयामुळे राजस्थान गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विजया झाला आहे. तर, मुंबईचा संघ तळाला आहे. परागने बुमराह आणि गेराल्डच्या गोलंदाजीची पिसे काढली.
मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याची घरच्या मैदानावरही हुर्यो उडवण्यात आली. त्यामुळे समालोचक संजय मांजरेकर यांनाही उपस्थितांना शांत राहा, नीट वागा, असे सांगावे लागले. तरीही उपस्थित प्रेक्षक ‘रोहित, रोहित’ असाच उद्घोष करत होते. मुंबई सामना हरत असतानाही असाच उद्घोष सुरू होता.
गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नंतरच्या क्रमांकावर फलंदाजीला उतरल्याबद्दल टीका झाली होती. नंतर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात स्वतः गोलंदाजीने सुरुवात केल्यानंतरही त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो सुरुवातीला फलंदाजीला आला आणि दुसऱ्या इनिंगमध्ये एकही चेंडू टाकला नाही. मात्र फलंदाजीमध्येही तो फारशी चमक दाखवू शकला नाही.
रियान पराग, चहल चमकले
याआधीच्या हंगामात पुरेशी चमक दाखवू न शकलेल्या परागने अर्धशतक ठोकून विराट कोहलीकडून ऑरेंज कॅप मिळवली आहे. त्याने संयमी खेळी करून विजय मिळवला. तसेच, त्याने दोन विकेटही घेतल्या. त्यामुळे तीन सामन्यांत त्याने सहा विकेट घेतल्या आहेत. चहल यानेही चांगली कामगिरी केली.
हे ही वाचा:
बाल्टिमोर ब्रिजला धडकलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचारी चौकशी संपेपर्यंत जहाजावरचं थांबणार
व्हीव्हीपॅट स्लिम मोजणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
‘नावे बदलल्याने काही फरक पडत नाही’
जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप; जीवितहानी नाही
राजस्थानच्या ट्रेन्ट बोल्ट आणि नांद्रे बर्गर यांच्या गोलंदाजीपुढे मुंबईचे फलंदाज निष्प्रभ ठरले. बोल्टने मुंबईच्या तीन फलंदाजांना शून्यावर बाद केले. तर, युझवेंद्र चहल आणि आवेश खान यांनी मधल्या षटकांची जबाबदारी सांभाळून मुंबईच्या खेळाडूंना रोखले. टीम डेव्हिड याने २४ चेंडूंत १७ धावा केल्या आणि मुंबईचा संघ १२५ धावाच करू शकला. यंदाच्या हंगामातील कोणत्याही संघाची ही सर्वांत कमी धावसंख्या ठरली.