महाराष्ट्र्रात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असून दर दिवशी येणारा रुग्णवाढीचा आकडा खूपच चिंताजनक आहे. मंगळवारी महाराष्ट्रात २७,९१८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर २३,८२० लोंकाना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात मंगळवारी कोवीडमुळे १३९ जणांनी आपला जीव गमावला आहे. महाराष्ट्र राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ८५.७१% आहे. तर मृत्यू दर १.९६% इतका आहे.
महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित दहा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजेच आठ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर अशा आठ जिल्ह्यांत महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्रातल्या या बिघडलेल्या कोरोना परिस्थितीबद्दल केंद्र सरकारकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन
पुन्हा एकदा ऑनलाईन सुनावणी घ्यावी; बार असोसिएशनची विनंती
ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल
राजकीय नेतृत्वानेच केली वाझेची नियुक्ती…राऊतांनीच दिली पुष्टी
देशातील सर्वाधीक कोरोना रुग्ण संख्या सध्या पुणे जिल्ह्यात आहे. तर पुण्यात नागरिकांनी नियम आणि निर्बंध पाळले नाहीत तर नाईलाजाने दोन एप्रिलला कडक पाऊले उचलावी लागतील आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याआधीच दिला आहे.
एकीकडे भारताचा दर आठवड्यात कोरोना रुग्ण वाढण्याचा दर हा सरासरी ५.६५% असताना महाराष्ट्रात मात्र हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त म्हणजेच २३% इतका आहे. महाराष्ट्रातल्या या बिघडलेल्या परिस्थितीमुळे राज्य पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जाताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या विषयीचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागायचे आणि त्यानुसार नियोजन करायचे आदेश दिले आहेत. सध्या महाराष्ट्रात रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लावण्यात आली आहे.