मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातील प्रतिष्ठित व्यक्तींना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याकरिता म्हणून आमंत्रण देण्याचे काम सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. भारतातील प्रत्येक नागरिक २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरातून यासाठी भेटवस्तू पाठविण्यात येत आहेत.

देशातील खेळाडू, व्यावयायिक, कलाकारांना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळत आहे. अशातच आपल्या गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि गेली अनेक दशके रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अयोध्या राम मंदिर सोहळ्यासाठी आशा भोसले, उषा मंगेशकर यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले. त्यामुळे आशा भोसले आणि उषा मंगेशकर या २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अयोध्येतील नया घाटला लता मंगेशकर चौक असे नाव देण्यात आले आहे. लता मंगेशकर चौक सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यांनी गायलेली राम धुन ही लता मंगेशकर चौकात २४ तास लाऊडस्पीकरद्वारे ऐकू येते.

मंगेशकर कुटुंबासोबतच अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, कंगना रणौत, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, रजनीकांत, मनमोहन सिंग अशा अनेक दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अरुण योगीराज यांनी कोरलेल्या मुर्तीवरच अभिषेक होणार!

देवरा काँग्रेसचे बिभीषण ठरू शकतात…

अयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

एटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून आले २१ लाख रुपये!

याशिवाय मुकेश अंबानी, अनिल अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी आणि टीएस कल्याणरामन यांसारख्या उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योगपतीही या कार्यक्रमाचा भाग असतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार आहे.

Exit mobile version