भारताचा कोविड रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक!

भारताचा कोविड रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक!

लोकसंख्येच्या बाबतीत जगात क्रमांक दोनचा देश असूनही भारताचा कोविड रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक आहे. आजवर भारतातले एक कोटी पेक्षा अधिक नागरिक कोविड विरोधातील लढाईत विजयी झालेले आहेत. तर भारतात दिवसागणिक मृत्यूंची संख्याही कमी होत आहे.

कोविड या जागतिक महामारी विरोधात लढताना भल्या भल्या विकसित देशांच्या तोंडाला फेस आलेला असताना भारत सरकारच्या प्रयत्नांना मात्र चांगलेच यश मिळत आहे. दर वेळी नवनवीन प्रकारे याचा प्रत्यय येताना दिसत आहे. मग तो कधी लसीच्या रूपाने असुदे किंवा रिकव्हरी रेटच्या रूपाने. भारताचा कोविड रिकव्हरी रेट ९७.३१% इतका असून हा रेट जगात सर्वाधिक आहे. आजवर भारतातल्या १.०६ कोटी लोकांनी कोविड विरोधातील लढाईत यश मिळवून रिकव्हर झाले आहेत. एवढेच नाही तर भारतातल्या ऍक्टिव्ह केसेस आणि रिकव्हर झालेल्या केसेस यांच्यातील फरक हा १,०४,७४,१६४ इतका आहे.

हे ही वाचा:

ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण?

ऑक्टोबर २०२० पासून कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे. भारतात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण खूप कमी असून त्याचा दर १.४३ इतका आहे जो जगातल्या सर्वात कमी दरांपैकी एक आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या संबंधीची माहिती दिली आहे.

Exit mobile version