कार्नाटकमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सय्यद नसीर हुसेन यांनी विजय मिळवल्यानंतर विधानसौधमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या गेल्याची पुष्टी फॉरेन्सिक अहवालानंतर ४ मार्च रोजी बेंगळुरू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान फॉरेन्सिक अहवालानंतरसुद्धा ऑल्ट न्यूजचे मोहम्मद झुबेरने तीन अटक आरोपी इल्थाज, मुनावर आणि मोहम्मद शफी यांना संरक्षण देणे सुरू ठेवले आहे.अनेकांनी झुबेरच्या नासीर साब जिंदाबाद च्या घोषणा दिल्याबद्दल त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.
२७ फेब्रुवारी रोजी काँग्रेस नेत्याच्या राज्यसभा विजयानंतर झालेल्या घोषणांबद्दल ‘खोटे दावे’ सुरू केल्याबद्दल स्वयंघोषित तथ्य-तपासकने कन्नड वृत्तवाहिन्यांना दोष दिला होता. त्यानंतर त्यांनी अलीकडील हनुमान ध्वज हटवण्याचा वाद, काँग्रेस सरकारचे हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय एंडॉवमेंट (सुधारणा) विधेयक २०२४ आणि सध्याच्या पाकिस्तान समर्थक घोषणांच्या वादाची उदाहरणे देऊन काँग्रेस पक्षाला ‘प्रचाराचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल’ शाब्दिक फटकारले होते. अशाप्रकारे भाजप स्थानिक आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या मदतीने प्रचारयुद्ध जिंकत आहे आणि कर्नाटकात काँग्रेसला त्याचा मुकाबला कसा करायचा याबद्दल अजूनही माहिती नाही, असे जुबेर यांनी म्हटले आहे. जुबेरची हि लांबलचक बडबड म्हणजे कॉंग्रेस समर्थकांना संरक्षण देणे आणि स्वतःला वाचवणे यापेक्षा वेगळी नाही. झुबेर हा फॉरेन्सिक विश्लेषणाच्या निष्कर्षांचे खंडन करत आहे.
हेही वाचा..
वीर सावरकरांवर का बनवला चित्रपट?
सचिन तेंडुलकर यांनी सांगितले स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे फायदे
स्पॅनिश महिलेला मारहाण करून बलात्कार!
शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार
अशा प्रकारे फॉरेन्सिक अहवाल फेटाळण्याची हि पहिलीच वेळ नाही. २०२२ मध्ये बंदी घातलेल्या इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सलाम नावाच्या व्यक्तीला भिलवाडा पोलिसांनी रॅलीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याबद्दल अटक केली होती. त्या प्रकरणात झुबेरने दावा केला होता की घोषणा “एसडीपीआय झिंदाबाद” होत्या, “पाकिस्तान झिंदाबाद” नाहीत. त्यानंतर लगेचच ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी व्हायरल व्हिडिओचा फॉरेन्सिक अहवाल ‘दोषपूर्ण’ म्हणून फेटाळून लावला होता.