25 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरविशेषदिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी रामदेव बाबांनी न्यायालयात हजर होऊन मागितली माफी

दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी रामदेव बाबांनी न्यायालयात हजर होऊन मागितली माफी

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून फटकारले होते. शिवाय त्यांना अवमानाची नोटीस बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. योगगुरु रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर मंगळवार, २ एप्रिल रोजी रामदेवबाबा आणि बाळकृष्ण हे दोघेही न्यायलयात हजर झाले होते. सुनावणीवेळी रामदेव बाबांच्या वकिलांनी म्हटलं की, “आम्ही अशा जाहिरातींसाठी माफी मागतो. आपल्या आदेशानुसार स्वतः योगगुरु रामदेव बाबा न्यायालयात पोहोचले आहेत.” पतंजली आयुर्वेदच्या वकिलांनी पुढे म्हटलं की, स्वतः रामदेव बाबा न्यायालयात हजर असून ते माफी मागत आहेत. तरी न्यायालयाने त्यांच्या माफीची नोंद घ्यावी. आम्ही न्यायालयापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत नाही.”

हे ही वाचा:

अल जझीराला ‘दहशतवादी वाहिनी’ म्हणत इस्रायलमध्ये प्रक्षेपणावर बंदी

सीरियामध्ये इराणी दूतावासाजवळ इस्रायलचा हवाई हल्ला

ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!

छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!

वकिलांनी या प्रकरणासंदर्भात असंही म्हटलं की, “दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची आमच्या मीडिया प्रमुखांना माहिती नव्हती. त्यामुळे अशी जाहिरात चालवली गेली.” मात्र, यावर न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशाची कल्पना नव्हती हे समजणं अवघड आहे. दरम्यान, न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, रामदेव बाबांनी योगाच्या क्षेत्रात मोठं काम केलं आहे. परंतु, त्यांनी एलोपथी औषधांवरुन असे दावे करणं चुकीचं आहे. त्यांनी त्यांची जाहिरात करावी परंतु एलोपथी चिकित्सा पद्धतीवर विनाकारण टीका करता कामा नये. सर्वोच्च न्यायालयाने २०२३ मध्ये पतंजली कंपनीला आदेश दिला होता की, त्यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती माघारी घ्याव्यात. जर त्यांनी असं केलं नाही तर कारवाई करावी लागेल. पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातींवर एक कोटी रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा