आमिर खानच्या ‘दंगल’मध्ये तरुण बबिता कुमारी फोगटची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर हिचे आज दिल्लीत निधन झाले. ती १९ वर्षांची होती. पायाला फ्रॅक्चर झाल्यानंतर करण्यात आलेल्या औषधोपचाराचा दुष्परिणाम तिच्यावर झाल्याने तिला मृत्यूला सामोरे जावे लागले. अभिनेता अमीर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने तिच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दु:ख झाले आहे. तिची आई पूजा आणि संपूर्ण कुटुंबाप्रती आमची मनःपूर्वक शोक आहे. अशी प्रतिभावान तरुण मुलगी, अशी टीम प्लेयर, दंगल सुहानी शिवाय अपूर्ण आहे.” “सुहानी, तू नेहमी आमच्या हृदयात एक तारा राहशील, तुला शांती मिळो, असा संदेश प्रॉडक्शन हाऊसकडून समाज माध्यमावर देण्यात आला आहे.
हेही वाचा..
“पूर्वी मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची; आता रडगाणी ऐकू येतात”
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममधील मंडप कोसळून आठ जण जखमी
युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात
शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू
सुहानीचा याआधी पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या उपचारादरम्यान तिला मिळालेल्या औषधांचा दुष्परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. असे वृत्त आहे की तिच्या शरीरात द्रवपदार्थ टिकून राहण्यास सुरुवात झाली, जे तिच्या अकाली मृत्यूचे कारण असल्याचे मानले जाते. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तिला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
२०१६ मध्ये आलेल्या ‘दंगल’ चित्रपटात तरुण बबिता कुमारी फोगटची भूमिका केल्यानंतर सुहानी घराघरात प्रसिद्ध झाली होती. जून २०१९ मध्ये सुहानीनेही तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयापासून ति थोडी लांब होती. समाजमाध्यमावर सुद्धा ति सक्रीय नव्हती. २०२१ मध्ये तिने आपली शेवटची पोस्ट समाज माध्यमावर शेअर केली होती.