28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरविशेषचेन्नईकडून गुजरातचा पराभव

चेन्नईकडून गुजरातचा पराभव

Google News Follow

Related

पाचवेळा इंडियन प्रिमिअर लीगचा किताब जिंकणाऱ्या चेन्नईने गुजरातला ६३ धावांनी पराभूत केले. गेल्या वर्षी अंतिम फेरीत धडकणाऱ्या गुजरातचा चेपॉक स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात पराभव करून गतविजेत्या चेन्नईने आणखी एका विजयाची नोंद केली.

चेन्नईने सहा बाद २०६ धावांचे लक्ष्य गुजरातसमोर ठेवले होते. मात्र गुजरातचा संघ आठ बाद १४३ धावांतच आटोपला. त्यामुळे आयपीएल २०२४च्या गुणतक्त्यात दोन्ही सामने जिंकून चेन्नईने चार गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे चेन्नईचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाड सध्या खुशीत असून गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याला मात्र पहिल्यांदाच पराभवाची चव चाखायला लागली. गेल्या वर्षी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करून पाचवे जेतेपद पटकावले होते.

चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि राचिन रवींद्र या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी अझमतुल्लाह ओमरझाई आणि उमेश यादव यांना झोडपून काढले. त्यामुळे गिलने सहाव्या षटकातच राशिद खान याला गोलंदाजी दिली. राशिदने या संधीचे सोने करत रवींद्रची विकेट घेतली. त्याने सहा चौकारांसह तीन षटकार खेचून २० चेंडूंत ४६ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर गायकवाड आणि अजिंक्यने बाजू सांभाळली आणि ४२ धावांची भागीदारी केली. मात्र साई किशोरने ११व्या षटकात अजिंक्यला बाद केले. तर, १३व्या षटकात स्पेन्सर जॉन्सन याने गायकवाड याला बाद केले. त्याने ३६ चेंडूंत ४६ धावा केल्या.

मैदानात उतरलेल्या शिवम दुबे याने गुजरातच्या फिरकीपटूंची पिसे काढली. त्याने आयपीएलमधील त्याचे सातवे अर्धशतक ठोकले. तसेच, न्यूझीलंडच्या डेरिल मिचेलसोबत ५७ धावांची भागीदारी केली. त्याने २२ चेंडूंत ५० धावा केल्या. मात्र तो पुढच्याच राशिदच्या चेंडूवर तो बाद झाला. दुबेने २३ चेंडूंत ५१ धावा केल्या. त्यात दोन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्याने आता आयपीएल २०२४मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल तीन धावपटूंमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने ८५ धावा केल्या आहेत. तो आता पंजाबचा सॅम करन (८६ धावा) आणि बेंगळुरूचा विराट कोहली (९६) यांच्या मागे आहे. त्यानंतर समीर रिझवीने रशिदला दोन षटकार खेचले. त्यामुळे चेन्नईला सहा बाद २०६ धावसंख्या उभारता आली.

गुजरातने गमावल्या झटपट विकेट

गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज वृद्धमान साहा यांनी २०७ धावांचे लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न सुरू केले असतानाच दीपक चहर याने गिल याला बाद केले. त्यानंतर त्याने साहालाही बाद केले तेव्हा गुजरातची अवस्था दोन बाद ३४ अशी झाली होती. डेव्हिड मिलर आणि बी साई यांनी ४१ धावांची भागीदीर केली. मात्र रहाणे याने मिलरचा अप्रतिम झेल पकडला आणि तुषार देशपांडे याने टी२० क्रिकेटमधील १००व्या विकेटची नोंद केली. साई सुदर्शन याने ३१ चेंडूंत ३७ धावा करून बाद झाला. देशपांडे यने ओमारझाई याची विकेट घेतली तर, राशिद खान याला मुस्तफिझुर रेहमान याने बाद केले. त्यामुळे गुजरातचा संघ आठ विकेट गमावून केवळ १४८ धावा करू शकला. देशपांडे, मुस्तफिझूर आणि चहर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

हे ही वाचा:

वॉशिंग मशिनमध्ये नोटांची थप्पी; ईडीने छाप्यात जप्त केले २.५४ कोटी रुपये

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

गुजरातवरील विजयानंतर आता चेन्नईचे लक्ष्य दिल्लीच्या सामन्याकडे असेल. त्यांचा सामना रविवार, ३१ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअममध्ये रंगणार आहे. तर, त्याच दिवशी गुजरातचा सामना अहमदाबादमध्ये हैदराबादशी होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा