26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषग्रामीण भारत महोत्सव विकासयात्रेची झलक

ग्रामीण भारत महोत्सव विकासयात्रेची झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चे उद्घाटन केले. विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने लवचिक ग्रामीण भारताची उभारणी ही या महोत्सवाची संकल्पना आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा ग्रामीण भारत महोत्सव भारताच्या विकासयात्रेची झलक आहे आणि विकसित भारत निर्माणाची ओळख देखील आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्यामधले जे लोक ग्रामीण भागात जन्मले आणि वाढले आहेत त्यांना गावांमधले सामर्थ्य माहिती आहे. गावात राहणाऱ्या लोकांमध्ये गावांचा आत्मा आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, गावात राहिलेल्यांना ग्रामीण जीवन कसे जगायचे हे देखील माहिती आहे. मोदी म्हणाले की, बालपण एका छोट्या शहरात, साध्या वातावरणात व्यतीत झाल्याबद्दल ते स्वतःला नशीबवान समजतात. शहर सोडल्यानंतर ते बराच काळ ग्रामीण भागात राहिले. मी गावातल्या अडचणी अनुभवल्या आहेत आणि ग्रामीण भागातले सामर्थ्यदेखील मला माहीत आहे. बालपणापासून मी पाहिले आहे की गावांमधले लोक भरपूर कष्ट करतात. परंतु पैशांअभावी त्यांना बऱ्याच संधी गमवाव्या लागतात. गावातल्या लोकांकडे विविध क्षेत्रांमधले सामर्थ्य असूनही त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यामध्ये हे सामर्थ्य हरवून जाते. नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध नसणे अशा अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो असे त्यांनी नमूद केले. हे सगळे पाहिल्यानंतर त्यांना गावातल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याचा विचार करुन मनात त्याप्रमाणे निश्चय केला. गावांमधले अनुभव आणि शिकवण यामधून प्रेरणा घेत आज ग्रामीण भागात अनेक विकासकामे करण्यात येत आहेत.

हेही वाचा..

वायुसेनेच्या तळावर इंडस्ट्री आउटलुक इव्हेंटचे आयोजन

विख्यात शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

सांगलीच्या श्रीराम मंदिर चौकात १०० फुटी भगवा ध्वज उभारणार

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट ; ६ कामगारांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी म्हणाले, २०१४ पासून ते सतत ग्रामीण भारताची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांना सन्मानाने जगायला मिळेल याची हमी देण्याला माझ्या सरकारचे प्राधान्य आहे. सक्षम ग्रामीण भारताची हमी, ग्रामस्थांसाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देणे, स्थलांतराचे प्रमाण कमी करणे आणि ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य सुलभ करणे हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, म्हणूनच सरकारने प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काही योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधून देण्यात आले, ग्रामीण भारतातल्या करोडो लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून देण्यात आली आणि जलजीवन मिशनअंतर्गत लाखो घरांना सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

सध्या १.५ लाखांपेक्षा अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांमधून लोकांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत’ असे पंतप्रधान म्हणाले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरू केलेल्या टेलिमेडीसीन उपक्रमाद्वारे गावांमधील लोकांना सर्वोत्तम डॉक्टर्स आणि रुग्णालयांची सेवा उपलब्ध झाली आहे असेही पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, इ संजीवनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील करोडो लोकांना लिमेडिसीनचा लाभ झाला आहे. कोविड साथीच्या काळात भारतातल्या गावांनी ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचे अख्ख्या जगाला आश्चर्य वाटते आहे असे मोदी यांनी नमूद केले. त्यावेळी प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीला लस मिळेल याची खबरदारी सरकारने घेतली असे मोदी यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा