ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

ख्रिश्चन धर्म स्वीकाराण्यासाठी आर्थिक आमिष

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये धर्मांतराच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हिंदू धर्मातील सुमारे ११० स्त्री-पुरुषांना दोन बसमधून धर्म परिवर्तनासाठी उन्नाव येथील चर्चमध्ये नेले जात होते. या प्रकरणातील आरोपींनी त्यांना लग्नाचे चांगले प्रस्ताव, नोकरीचे प्रस्ताव, उत्तम वैद्यकीय सुविधा आणि ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले होते. या रॅकेटची माहिती मिळताच कानपूर पोलिसांनी धर्मांतर सिंडिकेट चालवल्याबद्दल दोन आरोपींना अटक केली. विल्यम्स (चर्चचे पुजारी) आणि दीपक मॉरिस अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर यूपी प्रोहिबिशन ऑफ लॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ऑर्डिनन्स २०२१ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. एफआयआरनुसार धर्मांतरानंतर ११० पुरुष आणि महिलांना हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती हटवण्यास सांगण्यात आले होते.

हेही वाचा..

केजरीवाल ‘आत’ गेल्यावर आता संजयसिंग ‘बाहेर’

कुराण जाळणाऱ्या इराकच्या सलवान मोमिकचा मृत्यू?

देश पेटविण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा देशातून सफाया करा!

‘इंडी’ गटात सावळा गोंधळ; जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती विरुद्ध फारुख अब्दुल्ला

याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त महेश कुमार म्हणाले की, आरोपींनी कानपूरच्या नवाबगंज, अरमापूर, कोहना आणि इतर काही ठिकाणच्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याचे वचन दिले होते. रोख रकमेव्यतिरिक्त त्यांना नोकरीची हमी देण्यात आली होती. समूहातील अविवाहित लोकांना जोडीदार शोधण्यात मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धर्मांतरण रॅकेटबद्दल माहिती मिळाली आणि अनेक हिंदू पुरुष आणि महिलांना धर्मांतरासाठी नेले जात असल्याचे समजताच त्यांनी कानपूरमधील नवाबगंज पोलिस स्टेशनच्या बोट क्लबजवळ दोन बसेस थांबवून त्यांच्याकडे आडमुठेपणाने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोकांनी त्यांना धर्मांतरासाठी आमिष दाखवून उन्नाव येथे नेले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

महेश कुमार म्हणाले, शनिवारी रात्री (३० मार्च २०२४) रात्री उशिरा म्हणजे १ च्या दरम्यान पोलिसांना कळवले की धर्मांतरासाठी २ बसेसमधून ११० हून अधिक लोकांना नवाबगंज येथून उन्नाव येथील चर्चमध्ये नेले जात आहे. पोलिसांनी गंगा बॅरेजवर बॅरिकेड्स लावून तपासणी केली. ते पुढे म्हणाले की, बसमधील लोकांची चौकशी केली असता त्यांना कानपूरच्या नवाबगंज, अरमापूर, कोहना येथून आणण्यात आले होते. त्यांना उन्नाव येथील चर्चमध्ये नेले जात होते. रात्री उशिरा, उन्नाव येथील एका चर्चमध्ये धर्मांतर समारंभ आयोजित करण्यात आला होता. हे सर्व लोक दुर्बल घटकातील आहेत.

 

Exit mobile version