कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

कोटामध्ये १८ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

काही दिवसांपूर्वीच कोचिंग हबमधून आणखी एक जण बेपत्ता झाल्यानंतर राजस्थानमधील कोटा येथे १८ वर्षीय कोचिंग विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. युवराज असे त्या विद्यार्थाचे नाव आहे. तो सीकर जिल्ह्यातील असून तो एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता.

शनिवारी युवराज कोटाच्या ट्रान्सपोर्ट नगर भागातील वसतिगृहातून सकाळी ७ च्या सुमारास कोचिंग सेंटरमध्ये जाण्यासाठी निघाला. तेव्हापासून त्याचा पत्ताच लागला नाही. त्याने आपला मोबाईल फोन सुद्धा वसतिगृहात ठेवला आहे. रचित सोंध्या हा दुसरा विद्यार्थी कोटा येथून बेपत्ता झाल्याच्या अवघ्या आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. सोध्याही वसतिगृहातून बाहेर पडल्यानंतर गायब झाली होती.

हेही वाचा..

जयस्वाल पुन्हा ‘यशस्वी’, सलग दुसरे द्विशतक

पोखरणमध्ये ‘वायू शक्ती-२४’चा थरार!

शिवकालीन दांडपट्ट्याला ‘राज्यशस्त्र’ म्हणून मिळणार दर्जा!

कमलनाथ यांच्यानंतर मनीष तिवारीही भाजपच्या संपर्कात?

पोलिसांच्या एका अहवालानुसार मध्य प्रदेशातील रहिवासी सोंध्या नियमित चाचणीसाठी वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर पडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कॅब घेऊन गेल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो गराडिया महादेव मंदिरातून जंगलात प्रवेश करताना शेवटचा दिसला होता. सोमवारी संध्याकाळी उशिरा पोलिसांना सोंध्याची बॅग, मोबाईल फोन, रूमच्या चाव्या आणि इतर सामान मंदिराजवळ सापडले. पोलिस आणि एसडीआरएफ टीम्सकडून तपास सुरु आहे.

 

Exit mobile version