काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताने श्रीलंकेला देऊ केलेल्या कचाथीवू बेटाचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीही या बेटाचा उल्लेख केला होता. स्वातंत्र्यानंतरही हा भूभाग भारताच्या अखत्यारीत होता. पण त्यावर श्रीलंकेने दावा होता. १९७४ मध्ये झालेल्या एका करारानुसार तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला दिले होते, असे आता माहिती अधिकारांतर्गत आलेल्या माहितीमधून उघड झाले आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये कचाथीवू बेट श्रीलंकेला दिलं होतं. तामिळनाडूमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी याप्रकरणी आरटीआय दाखल केली होती. यातून असं समोर आलं की, भारताच्या किनाऱ्यापासून २० किलोमीटर दूर पाल्कच्या सामुद्रधूनीमध्ये असलेले १.९ स्क्वेर किलोमीटरचे बेट श्रीलंकेला देण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर कचाथीवू बेट भारताच्या ताब्यात होते. पण, श्रीलंकेने म्हणजे तेव्हाच्या सिलोनने या बेटावर दावा सांगितला होता. भारताच्या नौदलाला याठिकाणी युद्धसराव नाकारण्यात आला. शिवाय, १९९५ मध्ये सिलोन हवाईदलाकडून याठिकाणी युद्धाभ्यास करण्यात आला होता.

भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती

आरटीआयमधून आलेल्या माहितीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, “डोळे उघडणारे आणि चकित करणारे! नवीन तथ्ये हे उघड करतात की, काँग्रेसने कचाथीवू बेटाला कसे सोडून दिले. यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात राग असून लोकांच्या मनात पुष्टीही झाली आहे की, आम्ही काँग्रेसवर कधीही विश्वास ठेवू शकत नाही. भारताची एकता, अखंडता आणि हित कमकुवत करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे.”

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एकदा संसदेत म्हटले होते की, या बेटाचा मुद्दा संसदेत पुन्हा चर्चेत यावा अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे आम्ही त्यावरचा दावा सोडण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही. तत्कालीन राष्ट्रकुल सचिव वायडी गुंदेविया यांनी या संदर्भात एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल १९६८ मध्ये सल्लागार समितीने पार्श्वभूमी म्हणून वापरला होता.

१९६८ नंतर इंदिरा गांधी यांची या मुद्द्यावरुन श्रीलंकेच्या पंतप्रधानांशी चर्चा सुरु झाली होती. या मुद्द्यावरुन भारताच्या संसदेत गदारोळ देखील झाला. विरोधकांनी हे बेट श्रीलंकेला देण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण, इंदिरा गांधी यांनी वाद घालत बसण्यापेक्षा दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं.

हे ही वाचा :

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील परभणीची जागा रासपाच्या महादेव जानकरांना

इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम

रिपोर्टनुसार, ज्वालाभूमीच्या उद्रेकाने तयार झालेले कच्चाथीवू बेट १८७५ पासून भारताचा भाग होता. हे बेट ब्रिटिश शासनातील मद्रास प्रांतामध्ये येत होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या बेटावर पूर्णपणे भारताचा अधिकार होता, पण १९७४ मध्य हे बेट श्रीलंकेला देण्यात आले. याठिकाणी एक चर्च आहे. शिवाय श्रीलंकेतील मच्छिमार याठिकाणी थांबत असतात. भारताचा या बेटावर दावा सांगण्याचा कायदेशीर अधिकार होता. भारतीय मच्छिमारांसाठी हे बेट महत्त्वाचे ठरले असते. सध्या या भागात मच्छिमारासाठी गेलेल्या अनेक भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेकडून ताब्यात घेण्यात येत आहे.

Exit mobile version